ढाका : बांगलादेशातील ंिहदू व इतर अल्पसंख्याक समुदायांचे संरक्षण करण्याचे आश्वासन बांगला देशमधील हंगामी सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुक्रवारी दूरध्वनी करून दिले. बांगला देशमध्ये गेल्या काही आठवड्यांत झालेल्या ंिहसक निदर्शनांत तेथील अल्पसंख्याकांची घरे, मंदिरे, दुकाने आदींवर हल्ले करण्याचे प्रकार घडले होते. त्याबद्दल भारताने तीव्र चिंता व्यक्त केली होती.
बांगला देशमध्ये लोकशाही पुन्हा प्रस्थापित व्हावी, तिथे शांतता नांदावी, अशी आशा मोदी यांनी युनूस यांच्याकडे व्यक्त केली. बांगला देशमध्ये हिंदू व अन्य अल्पसंख्याकांवर गेल्या काही आठवड्यांत झालेल्या हल्ल्यांबाबत मोदी यांनी नुकतीच तीव्र चिंता व्यक्त केली होती.
भारतीय पत्रकारांना भेटीचे आमंत्रण
बांगला देशमधील स्थिती नियंत्रणात आणली असल्याचा दावा मुहम्मद युनूस यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी बोलताना केला. बांगला देशात अल्पसंख्यांकांवरील हल्ल्यांसंदर्भात अतिरंजित स्वरुपाच्या बातम्या प्रसारित झाल्या. त्यामुळे मी भारतीय पत्रकारांना बांगला देशमध्ये येण्याचे आमंत्रण देतो, असेही युनूस यांनी म्हटले आहे.