सेलू : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व खा. अमोल कोल्हे हे जिंतूर येथे शिवस्वराज्य यात्रेकरिता जात असताना सेलू येथे सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी खा. कोल्हे यांचा ताफा अडवून त्यांना मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतची भूमिका मांडण्याचा आग्रह केला.
महाविकास आघाडीच्या वतीने जिंतूर येथे काढण्यात येणा-या शिवस्वराज्य यात्रेकरिता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व खा. कोल्हे हे सेलू मार्गे जिंतूर येथे जात असताना रायगड कॉर्नर येथे सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी खा. कोल्हे यांचा ताफा अडवून त्यांना मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतची आपली भूमिका काय? असे विचारून आपली भूमिका मांडण्याचा आग्रह केला.
दरम्यान खा. कोल्हे यांचा ताफा अडवल्याचे कळताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना टाळून दुस-या मार्गाने जिंतूरकडे पलायन केले. मात्र हे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना जेव्हा समजले तेव्हा त्यांनी घोषणाबाजी करून नाराजी व्यक्त केली.