निलंगा : प्रतिनिधी
तालुक्यातील औराद शहाजानी येथे कोलकत्ता येथे झालेल्या प्रशिक्षीत महिला डॉक्टरवर अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणी संबंधित गुन्हेगारास कठोर शासन करून सदर खटला फास्टट्रॅकमध्ये चालवावा व कडक शासन करावे या मागणीचे निवेदन महसूल प्रशासनाचे प्रतिनिधी तलाठी शुभम वाघमारे यांना डॉक्टर असोसिएशन व केमिस्ट असोसिएशनच्या वतीने देण्यात आले. यानंतर पीडित डॉक्टर्सच्या प्रतिमेस श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी असोसिएशन अध्यक्ष डॉ यदुनाथ चिद्रेवार, डॉ ज्ञानेश्वर कदम, डॉ दीपक धुमाळ, डॉ शिवराज शंकद, डॉ मल्लिकार्जुन शंकद, डॉ बलवान बोलसुरे, डॉ बालाजी हेडे, डॉ चन्द्रशेखर बिरादार, डॉ महेश हलगरकर, डॉ महेश मुळे, डॉ आनंद खामकर, डॉक्टर टाकळीकर, डॉ हंसराज माने. पत्रकार दीपक थेटे, लक्ष्मण पाटील यांच्यायासह केमीस्ट संघटनेचे अध्यक्ष बालाजी थेटे राजप्पा शंकद, बालाजी शिंंदे, भगवान लड्डा, प्रमोद जाधव, बजरंग मरे, योगेश स्वामी, पांडुरंग माकणे, धनाजी जाधव, भगवान बोलसुरे, पशुपती हिरेमठ, मनोज टोम्पे, आकाश खामकर, सुधीर बसुदे, सतीश हाणेगावे, बालाजी पाटील आदी उपस्थित होते.