26.2 C
Latur
Friday, November 15, 2024
Homeराष्ट्रीयदर दोन तासांनी पोलिसांना रिपोर्ट द्यावा लागणार

दर दोन तासांनी पोलिसांना रिपोर्ट द्यावा लागणार

कोलकाता : कोलकातामध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या आणि खूनाच्या घटनेनंतर जगभरातून संताप व्यक्त होत आहे. कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाने देशभरातील सर्व पोलिस दलांना निर्देश जारी केलेलेआहेत.

केंद्रीय गृहमंत्रालयाने शनिवारी दिलेल्या निर्देशानुसार, आता पोलिसांना दर दोन तासाला आपल्या भागातील कायदा आणि सुव्यवस्थेचा एक रिपोर्ट गृह मंत्रालयाला पाठवाला लागणार आहे. देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील पोलिसांना हे बंधनकारक असेल.

कायदा आणि सुव्यवस्थेवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी केंद्राने हे पाऊल उचलंल आहे. या आदेशामध्ये सततच्या अपडेट्सवर भर देण्यात आलेला असून सर्व पोलिस दलांना ई-मेल, फॅक्स किंवा व्हॉट्सअपद्वारे मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाला माहिती पुरवावी लागेल.

वेळीच संकट टाळता येणार
देशात कुठे काय घडतेय आणि त्यावर त्वरित पावले कशी उचलता येतील, यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. कोलकाता येथील संताप आणणा-या घटनेनंतर केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने असे आदेश काढले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR