श्रीनगर : वृत्तसंस्था
हवाई दल आणि लष्कराने मिळून पॅरा-ड्रॉप ऑपरेशनमध्ये आरोग्य मैत्री हेल्थ क्यूब अंदाजे १५ हजार फूट उंचीवर पोहोचले. आरोग्य मैत्री क्यूब हे जगातील पहिले एअर लिफ्टेड पोर्टेबल हॉस्पीटल आहे. यासंदर्भात माहिती देताना संरक्षण मंत्रालयाने अशा प्रकारचे पहिले अचूक पॅरा-ड्रॉप ऑपरेशन आहे, असे सांगितले. हे भीष्म प्रकल्प अंतर्गत विकसित केले आहे. या ऑपरेशनने डोंगराळ भागातही प्रभावी मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण कार्य करण्याची क्षमता दाखवून दिली.
यशस्वी पॅरा-ड्रॉपने सशस्त्र दलांचे समन्वय आणि वेळेवर आणि प्रभावी मदत देण्याची त्यांची क्षमतादेखील दाखवली आहे. वायूसेनेने क्यूबला एअरलिफ्ट करण्यासाठी आणि अचूकपणे पॅरा-ड्रॉप करण्यासाठी सी-१३० जे सुपर हर्क्युलस हे प्रगत रणनीतिक वाहतूक विमान वापरले. लष्कराच्या पॅरा ब्रिगेडने अत्याधुनिक प्रिसिजन ड्रॉप उपकरणे वापरून क्यूब टाकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
हे पोर्टेबल हेल्थ क्यूब्स आपत्कालीन परिस्थितीत उपयुक्त ठरू शकतात. आरोग्य मैत्री क्यूब्स ७२ क्यूब्सचे बनलेले आहेत. हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार पोर्टेबल हॉस्पीटलमध्ये दोन मास्टर क्यूब्स असतात. प्रत्येकात ३६-३६ मिनी क्यूब्स असतात. त्याचे वजन ७२० किलो आहे. आवश्यक असल्यास मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारणातही मदत मिळत मिळू शकते. त्यासाठी फक्त १२ मिनिटांत बाधित भागांत एअरलिफ्ट केले जाऊ शकते. हवाई दलाने नुकतीच आग्रा येथील भीष्म पोर्टेबल हॉस्पीटलची चाचणी घेतली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारी २०२३ मध्ये ग्लोबल साऊथ समिटमध्ये आरोग्य मैत्री प्रकल्पाची घोषणा केली होती. या अंतर्गत भारत नैसर्गिक आपत्ती किंवा मानवतावादी संकटांमुळे प्रभावित झालेल्या कोणत्याही विकसनशील देशाला आवश्यक वैद्यकीय पुरवठा करेल. हे प्रगत वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज आहे. यामध्ये ऑपरेशन थिएटर, एक्स रे मशिन, रक्त तपासणी उपकरणे, व्हेंटिलेटर, जनरेटर, स्ट्रेचर, मॉड्यूलर वैद्यकीय उपकरणे आहेत. गोळीबार, भाजणे, शस्त्रक्रिया आणि फ्रॅक्चरमुळे झालेल्या जखमींना हे उपयुक्त आहेत. या क्यूबद्वारे २०० हून अधिक रुग्णांवर उपचार केले जाऊ शकतात.
आरोग्य मैत्री क्यूबचे वजन ७२० किलो
आरोग्य मैत्री क्यूबचे वजन ७२० किलो आहे. ते एकूण ७२ क्यूब्सने तयार केले आहे. पोर्टेबल हॉस्पीटलमध्ये दोन मास्टर क्यूब असतात. त्यात प्रत्येकी ३६-३६ मिनी क्यूब असतात. त्याचे एकूण वजन ७२० किलो ग्रॅम असते. आपत्कालीन स्थितीत आरोग्य मैत्री क्यूबची मदत होते. तसेच मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारणातही याचा उपयोग होऊ शकतो. अवघ्या १२ मिनिटांत बाधित भागांत एअरलिफ्ट केले जाऊ शकते.
लष्कराला वेळेत मदत
आरोग्य मैत्री क्यूबमुळे आता पहाडी भागात लष्कराला तात्काळ मदत मिळणार आहे. पॅरा-ड्रॉप करण्यासाठी सशस्त्र दलाने महत्त्वाची भूमिका बजावली. त्यासाठी सी-१३० जे सुपर हरक्युलसच्या मदतीने निश्चित ठिकाणी पोहोचविण्यास मदत झाली. हे जगातील पहिले पोर्टेबल हॉस्पीटल ठरले आहे.