22.8 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeलातूरबांधकाम कामगारांच्या कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी त्वरित करावी 

बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी त्वरित करावी 

लातूर : प्रतिनिधी
इमारत व इतर बांधकाम कामगारांना सुरक्षेसह त्यांचे आरोग्य व इतर कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने शासनाने कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे. मात्र बांधकाम कामगारांसाठीच्या अनेक योजना या केवळ कागदावरच राहताना दिसत आहेत, असे सामाजिक कार्यकर्ते भटक्या-विमुक्त्त समूहाचे अभ्यासक तथा वडार समाज संघ, महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्याध्यक्ष श्रीकांत मुद्दे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी श्रीकांत मुद्दे असे म्हणाले की, सध्या महाराष्ट्राच्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे उपकरामधून २५ हजार कोटी पेक्षाही जास्त रक्कम जमलेली आहे. ज्या प्रमाणात रक्कम जमली आहे, त्या प्रमाणात त्याचे लाभ कामगारांच्या कल्याणकारी योजना महाराष्ट्र शासनाकडून राबवल्या जात नाहीत.  त्याऐवजी महाराष्ट्रातील या मंडळाची सर्व कामे अत्यंत विलंबाने सुरू आहेत. वास्तविक २००९ साली महाराष्ट्र शासनाने असा निर्णय केलेला आहे की, बांधकाम कामगारांची कामे एका महिन्यात पूर्ण केली जातील; परंतु महाराष्ट्रामध्ये मात्र नोंदीत बांधकाम कामगारांचा मृत्यू झाल्यावर त्याचे वर्ष श्राद्ध झाले तरी त्याला अंत्यविधीची रक्कम सुद्धा मिळत नाही. बांधकाम कामगारांच्या मुलीच्या विवाहासाठी ५१ हजार रुपये देण्याची तरतूद आहे. परंतु ते दिले जात नाही. यासह बांधकाम कामगारांच्या सर्व योजनांची त्वरील अंमलबजावणी व्हावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा श्रीकांत मुद्दे यांनी दिली आहे.
यावेळी असेही सांगण्यात आले की, सध्या संसार उपयोगी भांडे मिळण्याचे सुरू आहे. वास्तविक रोख रक्कम मिळण्याऐवजी भांड्याचे साहित्य मिळत असल्यामुळे किमान संसार उपयोगी या वस्तू मिळत असल्यामुळे या वस्तू चालू राहणं गरजेचं आहे. यावेळी रमाकांत मुद्दे, बाबासाहेब भांडेकर, गोविंद मुद्दे, सचिन वाडीकर, नितीन धोत्रे आदी समाज बांधव उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR