27.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeलातूरसुधीर देशमुख यांचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्काराने गौरव 

सुधीर देशमुख यांचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्काराने गौरव 

लातूर : प्रतिनिधी
महसूल विभागात उत्कृष्ट काम करणा-या अधिका-यांचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने महसूल दिनी गौरव करण्यात येतो. येथील उपविभागीय कार्यालयातील नायब तहसीलदार सुधीर देशमुख यांनी सन २०२३-२४ मध्ये उत्कृष्ट काम  केल्याबद्दल त्यांचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्काराने जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर-घुगे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
या प्रसंगी अपर जिल्हाधिकारी संगीता टकले,उपविभागीय अधिकारी रोहिणी न-हे-विरोळे, उपजिल्हाधिकारी डॉ. भरत कदम, उपजिल्हाधिकारी नितीन वाघमारे आदी उपस्थित होते. सुधीर देशमुख यांच्या या गौरवाबद्दल त्यांचे ग्राम संसद सिकंदरपूरच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR