27.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeराष्ट्रीय‘यूपीएससीऐवजी आरएसएसमधून’ होत आहे भरती

‘यूपीएससीऐवजी आरएसएसमधून’ होत आहे भरती

राहुल गांधींचा मोदी सरकारवर आरोप

नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नुकत्याच केलेल्या भरतीचा संदर्भ देत ते म्हणाले की, हे सरकार केंद्रीय लोकसेवा आयोगाऐवजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) माध्यमातून मोठ्या पदांवर भरती करत आहे, अशी सडकून टीका राहुल गांधींनी केंद्र सरकारवर केली आहे.

या प्रकरणावर राहुल गांधींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट टाकून सरकारवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, नरेंद्र मोदी केंद्रीय लोकसेवा आयोगाऐवजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून लोकसेवक भरती करून राज्यघटनेवर आघात करत आहेत. केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयातील महत्त्वाच्या पदांवर लॅटरल एन्ट्रीद्वारे भरती करून एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गांचे आरक्षण खुलेआम हिसकावले जात आहे.

हुशार तरुणांच्या हक्कावर दरोडा
मी नेहमीच म्हणत आलो आहे की, सर्वोच्च नोकरशाहीसह देशातील सर्व उच्च पदांवर वंचितांना प्रतिनिधित्व दिले जात नाही, त्यात सुधारणा करण्याऐवजी त्यांना लॅटरल एंट्रीद्वारे उच्च पदांवरून काढून टाकले जात आहे. हा यूपीएससीची तयारी करणा-या हुशार तरुणांच्या हक्कावरचा दरोडा आहे आणि वंचितांच्या आरक्षणासह सामाजिक न्यायाच्या संकल्पनेवर केलेला हल्ला आहे, असा आरोप राहुल गांधींनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR