28.1 C
Latur
Friday, November 15, 2024
Homeलातूरकायदा अमलबजावणी कडक तरीही अत्याचार बेधडक

कायदा अमलबजावणी कडक तरीही अत्याचार बेधडक

लातूर : विनोद उगीले
बदलापूर येथील अल्पवयीन शाळकरी मुलीवरील अत्याच्याराच्या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. या घटनेमुळे अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. लातूर जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या मागील सात महीन्यातील घटनेवर नजर टाकली असता पोक्सो कायदा व त्याची अमलबजावणी पोलीसांकडून कडक होत असली तरी संपेता संपेना भय इथले अशी काहीशीच आहे.
मागील दोन दिवसापुर्वी ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे एका शाळेत चार वर्षाच्या दोन मुलीवर शाळेतील सफाई कर्मचा-याने केलेल्या अत्याचाराच्या घटनेबद्दल राज्सभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेनंतर राज्यभरातील शिक्षण विभाग व पोलीस प्रशासन खडबडून जागा झाला आहे. पोक्सो कायदा व त्याची अमलबजावणी जरी पोलीसांकडून केली जात असली तरी लातूर जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची व शाळांतील सुरक्षतेतीची परस्थितीती पाहता ती काही समाधानकारक दिसून येत नाही.
लातूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १२७५ तर महापालिकेच्या १६,शासकीय ८, अनुदानित  ९६५, विनाअनुदानित ३९२ अशा एकूण २ हजार ६५६ शाहा असून त्यात जवळपास १ लाख ७५ हजार ५९८ मुली या शिक्षण घेत आहेत. या मुली ज्या शाळेत शिक्षण घेत आहेत त्यापैकी काय जवळपास सर्वच शाळेत शालेय विद्यार्थीनीची सुरक्षा ही वा-यावरच आहे. बहुतांश शाळात सीसीटीव्ही कॅमेरे ही नाहीत हे वास्तव आहे. तर जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या, गुन्हेगारीचा आलेख पाहिला तर जिल्ह्यात जानेवारी ते जुलै २०२४ या सात महिन्या दरम्यान पोक्सोतंर्गत बलात्काराची ४१ घटना घडल्या असून या प्रकरणी गुन्हे ही पोलीसांनी दाखल करत या गुन्ह्यातील ४१ आरोपींना गजाआड केले आहे.
तर पोक्सो कायद्यातंर्गत विनयभंगाच्या २४ घटना घडल्या असून २७ आरोपी विरोधात पोलीस अधिक्षक सोमय मुंडे व अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. अजय देवरे यांच्या र्माादर्शनाखाली तपास करणा-या पोलीस यंत्रणेने पोक्सो कायद्याची कडक अमलबजावणी करीत सर्वच आरोपींना अटक केली आहे. जरी पोलीस प्रशासनाकडून पोक्सो कायद्याची कडक अमलबजावणी केली जात असली तरी मागील सात महिन्यातील गुन्ह्यांची वाढती आकडेवारी ही भयावह अशीच असून हे पाहता संपता संपत नाही  भय इथले असे शब्द अपसूकच तोंडातून बाहेर पडल्या शिवाय राहत नाहीत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR