26.2 C
Latur
Thursday, November 14, 2024
Homeमहाराष्ट्रबदलापूर घटना; निलंबित पोलिस निरीक्षकांची मुंबईत बदली

बदलापूर घटना; निलंबित पोलिस निरीक्षकांची मुंबईत बदली

बदलापूर घटना; निलंबित पोलिस निरीक्षकांची मुंबईत बदली

बदलापूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश गुरूवारी महासंचालक कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. त्यात बदलापूर अत्याचार प्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक शुभदा शितोळे-शिंदे यांचीही मुंबईत बदली करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाच्या बदलीसाठी पात्र अधिका-यांची यादी मागवण्यात आली होती. त्या अनुषंगाने राज्यातील २२ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात मुंबई पोलिस दलात १४ अधिका-यांची बदली करण्यात आली आहे.

ठाणे शहर येथील अजय आपळे, नंदकुमार कैचे, गंगाराम वळवी, महादेव कुंभार, स्वाती पेटकर, अशोक भगत, चंद्रहार गोडसे, अनिल पडवळ, अनिल जगताप, संदीप धांडे, अतुल अडुरकर तर नवी मुंबईतील विजयकुमार पन्हाळे व संजीव धुमाळ यांची मुंबई पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. तर बदलापूर येथील पोलीस ठाण्यातील निलंबीत पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे-शिंदे यांचीही मुंबईत बदली करण्यात आली आहे. याशिवाय सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या तीन अधिका-यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यातील ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली सरवदे यांचीही मुंबईत बदली करण्यात आली आहे.

राज्य पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
राज्य पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि रश्मी शुक्ला यांच्यात महत्वाच्या विषयावर चर्चा झाली आहे. बदलापूरमध्ये अल्पवयीन मुलींसोबत झालेल्या दुर्दैवी घटना आणि त्यानंतर उदभवलेल्या परिस्थितीवर दोघं मध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. राज्यातील एकंदरीत कायदा सुव्यवस्थावर देखील चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. आजच बदलापूर प्रकरणात मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली होती. सुनावणी दरम्यान न्यायायाने संबंधित पोलिस प्रशासनाचा भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. या पार्शवभूमीवर मुख्यमंत्री आणि राज्य पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची ही बैठक महत्वाची मानली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR