27.3 C
Latur
Wednesday, November 13, 2024
Homeक्रीडाजागतिक कुस्तीमध्ये भारतीय मुलींचा दबदबा

जागतिक कुस्तीमध्ये भारतीय मुलींचा दबदबा

४ सुवर्णपदके जिंकली

नवी दिल्ली : जॉर्डन येथे सुरू असलेल्या १७ वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीपटूंनी आपला दबदबा निर्माण केला असून कुस्तीच्या विविध वजन गटात देशासाठी एक दोन नाहीतर ४ सुर्वणपदके पदके जिंकली आहेत. भारतीय कुस्तीपटूंच्या या कामगिरीमुळे ऑलिम्पिकमधील कुस्तीतील अपयशाचे दु:ख काहीसे कमी झाले आहे.

४३ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत आदिती कुमारीने ग्रीसच्या मारिया लुईझा गिका हिचा ७-० असा पराभव करत सुवर्णपदक जिंकले. ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत नेहाने जपानच्या सो त्सुत्सुईचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. ६५ किलो वजनी गटात पुलकितने डारिया फ्रोलोव्हाचा ६-३ असा पराभव करत सुवर्णपदक जिंकले. मानसी लाथेरने ७३ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत हाना पिरस्काया हिला हरवून सुवर्णपदक जिंकले. सुवर्णपदक जिंकून या चार कुस्तीपटूंनी जागतिक स्पर्धेत भारतीय कुस्तीचा दबदबा प्रस्थापित केला. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांनी मानसी लाथेरचे ७३ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे. लाथेर हा हरियाणाच्या जिंदमधील जुलाना भागातील लाजवाना कलान गावचा रहिवासी आहे.

ऑलिम्पिकमध्ये हुकले सुवर्णपदक
पॅरिस ऑलिम्पिकमध्येही भारताने कुस्तीमध्ये चांगली कामगिरी केली होती. अमन सेहरावतने ५७ किलो वजनी गटात सलग ३ विजय नोंदवून कांस्यपदक पटकावले होते. ५० किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत अमेरिकन कुस्तीपटूला पराभूत करून विनेश देशाला २०२४ च्या ऑलिम्पिकमधील पहिले सुवर्ण मिळवून देईल, असा विश्वास होता. पण हे होऊ शकले नाही.अंतिम सामन्याच्या अवघ्या काही तासांपूर्वी वजन जास्त असल्याने तिला अपात्र घोषित करण्यात आले. तपासणीत विनेशचे वजन १०० ग्रॅम जास्त होते. यामुळे ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR