23.5 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्र‘लाडकी बहीण’; नंदुरबारच्या बँकेत चेंगराचेंगरी

‘लाडकी बहीण’; नंदुरबारच्या बँकेत चेंगराचेंगरी

नंदुरबार : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. काही महिलांच्या बँकेच्या खात्याचे केवायसी प्रलंबित असल्याने त्यांच्या खात्यात पैसे आले नव्हते. त्यामुळे ही केवायसी करुन घेण्यासाठी नंदुरबारमध्ये एका बँकेत तुफान गर्दी झाली होती. यावेळी चेंगराचेंगरी झाली आणि त्यात दोन महिला बेशुद्ध पडल्या.

लाडकी बहीण योजनेचे पैसे अकाऊंटवर जमा झालेले नसल्याने केवायसीसाठी नंदूरबार जिल्ह्यातील धडगावच्या स्टेट बँकेच्या शाखेत ही गर्दी झाली होती. आज पहाटेपासूनच या शाखेत आदिवासी महिलांची मोठी गर्दी झाली होती. २० ते ३० किमी प्रवास करुन या महिला या ठिकाणी आल्या होत्या. या ठिकाणी इतकी तुफान गर्दी झाली होती की, त्यामुळे इथे चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती. यात अस्वस्थ वाटू लागल्यानं दोन महिला भोवळ येऊन पडल्या. इथे केवायसीसाठी स्वतंत्र लाईन किंवा स्वतंत्र खिडकीसारखी व्यवस्था नसल्याने हा प्रकार घडला आहे. ज्या ठिकाणी या महिलांनी गर्दी केली होती ती जागा खूपच अरुंद होती. या गर्दीमुळे खरंतर श्वास घ्यायलाही जागा नव्हती. त्यामुळे काही महिलांना या ठिकाणी त्रास होऊ लागला होता. यानंतर पोलिसांनी यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR