23.5 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeसोलापूरबदलापूरची घटना घृणास्पद : अस्मिता गायकवाड

बदलापूरची घटना घृणास्पद : अस्मिता गायकवाड

ठाकरे पक्षातर्फे तीव्र निदर्शने

सोलापूर : बदलापूरची घटना अतिशय निंदनीय, घृणास्पद व देशाला लज्जास्पद आहे. देशातील कायदा आणि व्यवस्था संपुष्टात आली असून या देशात व राज्यात आज महिला सुरक्षित नाहीत शिंदे, फडणवीस याची जबाबदारी घ्या व राजीनामा द्या आरोपीला ताबडतोब भर चौकात फाशी द्या, अशी मागणी शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाची रणरागिणी अस्मिता गायकवाड यांनी केली.

बदलापूर घटनेच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने सोलापूर येथे पूनम गेटसमोर तीव्र निदर्शने करण्यात आली त्यावेळी त्या बोलत होत्या. बदलापूर या ठिकाणी आदर्श विद्यालय या शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतील सफाई कर्मचा-यांनी अत्याचार केला. त्यामुळे देशभरात तीव्र संताप व्यक्त करून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पूनम गेटसमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी शिवसेना उपनेता गायकवाड यांनी शिंदे आणि फडणवीस सरकारचा निषेध व्यक्त केला. जिल्हाप्रमुख अजय दासरी, शहर प्रमुख दत्ता वानकर, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, लोकसभा क्षेत्र संघटिका शशिकला चिवड शेट्टी, शहर संघटिका जोहरा रंगरेज यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी उपजिल्हा संघटिका मंगल मोरे, उपशहर संघटिका जयश्री पाटील, मीना सुरवसे, रमा सरवदे, वैशाली सातपुते, श्रीदेवी बगले, अन्नपूर्णां कलाल, सुनिता आंबलगी, प्रियंका वाघमोडे, प्रभावती कोरे, अनुसया भोसले वत्सला सरवदे, यमुना सदाफुले, उपशहर प्रमुख धनंजय जानकर अमित श्रीराम, दंडगुले, भोसले, रतन गायकवाड, राजू जाधव, रेवण पुराणिक, सुरेश जगताप आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR