सोलापूर : प्रतिनिधी
दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना २०२३-२४ अंतर्गत वैयक्तिक मार्ग भरलेल्या शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम मिळाली नाही. दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील ई-पीक नोंदी न झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान ममिळावे या मागणी साठी माजी आमदार दिलीप माने यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना भेटून निवेदन दिले.
पंतप्रधान पिक विमा योजना २०२३ अंतर्गत वैयक्तिक पीक विमा अर्ज भरलेल्या अल्प शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम अदा झालेली आहे.जिल्ह्रातील दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे.दक्षिण सोलापूर तालुक्यातील सुमारे ५४ हजार ७१५ शेतकऱ्यांनी खरीप हंगाम २०२३-२४ मध्ये पीक विमा अर्ज भरला होता. पीक विमा कंपन्याकडून झालेल्या नुकसानीचे पंचनामे देखील झाले होते. मात्र दक्षिण सोलापूर तालुक्यातील फक्त ९१७ शेतकऱ्यांनाच पिक विमा प्राप्त झाला आहे. तर इतर ८० टक्के शेतकरी अद्याप पीक विमा मिळण्यापासून वंचित राहिले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात राज्य शासनाने सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकयांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे, दोन हेक्टर पर्यंत मदत करण्याचे निर्णय घेतले आहे. राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सन २०२३ च्या खरीप हंगामामध्ये ई-पीक पाहणी ॲप/पोर्टलव्दारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे.
नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्यकरीता पात्र राहणार आहेत.मात्र शेतकयांनी ई-पीकांची नोंदणी न केलेले दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक शेतकरी अनुदानापासून वंचीत राहिले आहेत. दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुक्यातील ई-पीक नोंदणी न केलेले मात्र शेतीमधील पिकांचे झालेल्या नुकसानीचा विचार करुन या अनुदानापासून वंचीत सर्व शेतकऱ्यांना अनुदान मिळण्याची विनंती केली.
यावेळी गंगाधर बिराजदार ,आप्पासाहेब बिराजदार-पाटील,विकास पाटील,निशांत लाडे,कल्याणी शिरगोंडे,पिरसाब हवालदार,रावसाहेब आळगी,महादेव बोरगी,इरेशा कोळी,नितिन देशपांडे,संजय जाधव, विकास बिराजदार,श्रीकांत बंडगर, माळप्पा बंडगर, सचीन ढेपे, ज्ञानोबा साखरे, दयानंद स्वामी आदि उपस्थित होते.
बैठकीनंतर दिलीप माने यांनी जिल्हाधिकारी यांच्या सोबत सकारात्मक चर्चा झाल्या प्रकरणी समाधान व्यक्त केले शेतकऱ्यांचा कळवळा असणारे जिल्हाधिकारी आहेत असे अधिकारी सर्वच विभागात असले तर शेतकरी नक्कीच आनंदी राहतील जिल्हाधिकारी यांचे शेतकऱ्यांबाबत असलेल्या संवेदनशीलतेचे कौतुक केले.