24.4 C
Latur
Sunday, September 22, 2024
Homeसोलापूरडॉक्टर व बदलापूर अत्याचार प्रकरणी निषेध व श्रद्धांजली

डॉक्टर व बदलापूर अत्याचार प्रकरणी निषेध व श्रद्धांजली

सोलापूर : कोलकाता येथील डॉक्टर व बदलापूर अत्याचार प्रकरणी निषेध व श्रद्धांजली मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला कर्मचारी युनियन यांचे वतीने दोन मिनिटे निशब्द थांबून आत्मचिंतन करून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन स्मिता पाटील ,इशादीन शेळकदे, महिला बाल विकास अधिकारी प्रसाद मिरकले ,शिक्षणाधिकारी कादर शेख, सुलभा वठारे, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी नरेंद्र खराडे, संजय पारसे, कृषी विकास अधिकारी नंदकुमार पाचकुडवे, लेखाधिकारी रूपाली रोकडे, पशुसंवर्धन अधिकारी स्नेहंका बोधनकर ,राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज, शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटनेचे निमंत्रक अशोक इंदापुरे,अध्यक्ष शंतनु गायकवाड, युनियन अध्यक्ष तजमुल मूतवली,विभागीय संघटक डॉ.एस.पी माने आदी उपस्थित होते.

सदरचा कार्यक्रम यशस्वीतेसाठी महिला कर्मचारी युनियन कार्यध्यक्ष स्वाती स्वामी,सचिव निर्मला राठोड,मृणालिनी शिंदे,सविता काळे,अंबिका वाघमोडे,अश्विनी सातपुते,आरती माढेकर ,सविता मिसाळ,ज्योती लामकाने,पुनम नर्सोडे, राजेश्री कांगारे अरुणा रांजणे,ज्योती माळी आदींनी परिश्रम घेतले. या या श्रद्धांजलीस आरोग्य कर्मचारी संघटनेचे समीर शेख, विष्णू सानेपागोलू,चतुर्श्री संघटनेचे श्रीशैल्य देशमुख, विस्ताराधिकारी संघटनेचे श्रीकांत मेहकर, बापूसाहेब जमादार ,सुधाकर खरबस,लेखा कर्मचारी संघटनेचे अमित सलगर ,युनियनचे सचिव विलास मसलकर, रोहित घुले, विशाल घोगरे, राकेश सोडी ,ऋषिकेश जाधव, मिथुन भिसे, रोहित शिंदे, कृषि संघटनांचे उमेश काटे, लिपिक वर्गीय संघटनेचे अध्यक्ष अविनाश गोडसे, वाहन चालक संघटनेचे शहानवाज शेख, दीपक चव्हाण, मैलमजूर संघटनेचे अध्यक्ष जाफर शेख,आदी उपस्थित होते.

या श्रद्धांजलीस जिल्हा परिषदेतील सर्व महिला अधिकारी कर्मचारी यांनी काळा ड्रेस घालून, पुरुष अधिकारी कर्मचारी काळी फित लावून या घटनेचा निशब्द निषेध करण्यात आले.यावेळी आदम नाईक, सत्तार शेख त्रिमूर्ती राऊत, श्रीधर कलशेट्टी, शिवानंद मम्हाने, शिवाजी राठोड आदींनी विशेष परिश्रम घेतले. अकरा पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व आधिकारी व कर्मचारी श्रद्धांजली व निषेध व्यक्त केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR