सोलापूर – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही बंद होणार नसून अविरत सुरू राहणार आहे. विरोधक त्याचा खोटा प्रचार प्रसार करत आहेत विरोधकांच्या भूलथाप्याला बळी पडू नये. आनंत जाधव हा नाते जपणारा नेता असून या भागातील नागरी नागरिकांच्या समस्या वेळोवेळी सोडवतात. मराठा वस्तीतील विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही. अशी ग्वाही आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली.
माजी नगरसेवक अनंत जाधव यांच्या प्रयत्नातून आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निधीतून मराठा वस्ती अंतर्गत ड्रेनेज पाईप लाईन टाकण्याच्या एक कोटी कामाचा शुभारंभ शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे, सामाजिक कार्यकर्ते दशरथ कसबे, राजकुमार पाटील आणि माजी नगरसेवक आनंत जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी आ. देशमुख बोलत होते.
माजी नगरसेवक आनंत जाधव यांनी भाजपच्या वचनपूर्ती आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना रक्षाबंधननिमित्त मराठा वस्ती येथे कार्यक्रमाचे आयोजन केले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आणि ज्येष्ठ महिलांच्या हस्ते राखी बांधून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. जाधव यांनी सर्व बहिणींना भेट म्हणून टिफिन बॉक्स दिला.
प्रास्ताविक भाजपा उपाध्यक्ष आनंत जाधव यांनी केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी व भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी सचिन साळुंखे, दशरथ भोसले, दिनेश फुटाणे, माऊली माने, युवराज सुरवसे, सचिन बुरांडे, बंटी हिंगमिरे, शुभम हुछे, रमेश रोहिटे, आकाश शिरसाट, प्रकाश ताकभाते, गणेश शिंदे यांच्या सह आनंत जाधव मित्रपरिवाराने परिश्रम घेतले.