23.3 C
Latur
Monday, September 23, 2024
Homeराष्ट्रीयकोलकाता बलात्कार प्रकरणी सात जणांची पॉलीग्राफ चाचणी

कोलकाता बलात्कार प्रकरणी सात जणांची पॉलीग्राफ चाचणी

कोलकाता : कोलकाता बलात्कार प्रकरणी सीबीआयने तपास सुरू केला आहे. दरम्यान, आता चौकशीत धक्कादायक खुलासे होत आहेत. आता पॉलीग्राफ चाचणीची वेळ आली आहे, सात जणांची पॉलीग्राफ चाचणी करण्यात आली. दिल्लीहून विशेष सीएफएसएल टीम कोलकाता येथे गेली आणि पॉलीग्राफ चाचणी घेण्यात आली. ज्यांची चाचणी करण्यात आली त्यात मुख्य आरोपी संजय रॉय, माजी प्राचार्य संदीप घोष, त्या रात्री नाईट ड्युटीवर असलेले चार कनिष्ठ डॉक्टर आणि एका स्वयंसेवकाचा समावेश आहे.

मुख्य आरोपी संजय रॉयची पॉलीग्राफ चाचणी तुरुंगातच करण्यात आली. उर्वरित सहा जणांची चाचणी सीबीआय कार्यालयात झाली. संजय हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याने त्याची पॉलीग्राफ चाचणी आवश्यक होती. त्याच्याकडून संशयानुसार गुन्हा केव्हा आणि कसा केला आणि त्याच्यासोबत आणखी कोणी सहभागी आहे का, याची माहिती घ्यायची आहे. माजी प्राचार्य संदीप घोष हे सुरुवातीपासूनच संशयाच्या भोव-यात आहेत. नवव्या दिवशीही त्याला प्रश्न विचारले जात आहेत. आतापर्यंत त्याची १०० तासांहून अधिक चौकशी करण्यात आली आहे.

संदीप घोष हे प्राचार्य होते त्यामुळे त्यांची चौकशी सुरू आहे. त्यांचे वागणे आणि निर्णय संशयाच्या भोव-यात आहेत. तीन प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्यांना या घटनेची माहिती केव्हा व कशी लागली, अहवाल दाखल करण्यास विलंब का झाला, पुरावे ठेवण्यात का निष्काळजीपणा केला. त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचाराची चौकशीही सुरू झाली आहे. याप्रकरणी सीबीआयने आज औपचारिकपणे गुन्हा दाखल केला आहे. कोलकोता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआय अधिका-यांनी अलीपूर कोर्टात त्याच्याविरुद्धच्या एफआयआरची प्रत सादर केली आहे.

पॉलीग्राफीमध्ये मोठा खुलासा होणार
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे, राज्याने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाकडून तपास सीबीआयकडे हस्तांतरित केला होता. सीबीआयने शनिवारी एसआयटीकडून आवश्यक कागदपत्रे गोळा केली आणि एफआयआर पुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. संदीप घोष याच्या कार्यकाळात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची विनंती करणा-या आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे माजी उपअधीक्षक अख्तर अली यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने निर्देश दिले होते. या प्रकरणात चार कनिष्ठ डॉक्टरांची चाचणी करण्यात आली. या प्रकरणाशी संबंधित मोठा खुलासा होऊ शकतो. कोलकाता बलात्कार प्रकरणाचे गूढ उकलण्यात सीबीआय चौकशी करत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR