लातूर : प्रतिनिधी
द डेक्कन शुगर टेक्नोलॉजिस्ट्स असोसिएशन (डीएसटीए) इंडियाने २०२४ वर्षातील प्रतिष्ठित ‘बेस्ट शुगर फॅक्टरी अवॉर्ड’ हा पुरस्कार विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखाना परिवारातील विलास सहकारी साखर कारखाना युनिट-२, तोंडार, उदगीर येथील कारखान्यास प्रदान केला, हा सहकार आणि साखर उद्योगातील मानाचा पुरस्कार माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी कारखान्याचे संचालक मंडळ, कार्यकारी संचालक यांनी डीएसटीएच्या वार्षिक अधिवेशनाच्या कार्यक्रमात पुणे येथे स्विकारला.
द डेक्कन शुगर टेक्नोलॉजिस्ट्स असोसिएशन (डीएसटीए) इंडियाचे गळीत हंगाम २०२३-२४ साठीच मानाच राज्यस्तरीय ‘बेस्ट शुगर फॅक्टरी अवॉर्ड’ साठी विलास सहकारी साखर कारखान्यानी केलेल्या कामगिरीचे मुल्यमापन करुनच या पारीतोषिकासाठी निवड करण्यात आली होती. सदरील पारितोषीक शनिवार दि. २४ ऑगस्ट रोजी पुणे येथील सभागृह, जे. डब्ल्यू. मॅरियट सेनापती बापट रोड येथे डीएसटीएच्या वार्षिक अधिवेशनाच्या उद्घाटन सत्रादरम्यान माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि राज्यातील मान्यवरांच्या हस्ते स्विकारण्यात आले.
कारखान्याच्या वतीने हा पुरस्कार माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्याचे व्हाईस चेअरमन रविंद्र काळे, कार्यकारी संचालक आत्माराम पवार, संचालक सर्वश्री गोविंद बोराडे, अनंत बारबोले, नारायण पाटील, बाळासाहेब बिडवे, अमर मोरे, रंजित पाटील, भैरवनाथ सवासे, गुरुनाथ गवळी, गोविंद डुरे, अमृत जाधव, भारत आदमाने, रामदास राऊत, सुभाष माने, संजय पाटील खंडापूरकर, कल्याण पाटील, ग्यानोबा गोडभरले, पंडीत ढगे, विनोबा पाटील, संदिप पाटील, मन्मथअप्पा किडे, संतोष तिडके, मारोती पांडे, कारखान्याचे अधिकारी अजय कोळगे, देविदास मोकाशे, सुनिलकुमार चापूले, राजेसाहेब खोसे, तानाजी गुमनार, किशन चौधरी, संदिप शिंदे आदीनी स्विकारला.
विकासरत्न विलासराव देशमुख साहेब यांची प्रेरणा, माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचे मार्गदर्शन, माजी मंत्री, आमदार, संस्थापक चेअरमन अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामिणचे आमदार धिरज विलासराव देशमुख, चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांचे नेतृत्वाखाली विलास सहकारी साखर कारखाना यशस्वीपणे वाटचाल करीत आहे. विलास सहकारी साखर कारखान्याने झालेल्या गळीत हंगामात कार्यक्षमतेचा केलेला वापर, पाण्याची बचत व पूर्नवापर, इंधन व ऊर्जेत बचत, साखर उता-यात वाढ, ऊसतोडणी, वाहतुक यंत्रणेचा कार्यक्षम वापर, तांत्रीक कार्यक्षमता, ऊसविकास योजना, मनुष्बळ विकास उपक्रम, ऊस गाळप, साखरेचा दर्जासह यावेळी या सर्व कामाचे द डेक्कन शुगर टेक्नोलॉजिस्ट्स असोसिएशन (डीएसटीए), पुणे व उपस्थित सर्व मान्यवरांनी कारखाना वाटचाली बद्दल व्यवस्थापन आणि प्रशासनाचे कौतुक केले.
या पारितोषिकाने विलास कारखान्यास गौरविण्यात आले, याबददल माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, माजी मंत्री, आमदार संस्थापक चेअरमन अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामिणचे आमदार धिरज विलासराव देशमुख, चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी, कर्मचारी वर्ग, वाहतूक ठेकेदार, तोडणी मंजूर व कंत्राटदार या सर्वाचे व्यवस्थापनाचे वतीने अभिनंदन केले.
माजी मंत्री आमदार अमित देशमुख आणि मांजरा परिवारातील व्यवस्थानपनाचे कौतुक
राज्याचे माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विलास साखर कारखान्याची उभारणी आणि यशस्वी वाटचाल सुरु आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील बंद असलेला हा कारखाना अवसायानात निघालेला होता. तेथील शेतक-यांच्या ऊस गाळपाचा प्रश्न निर्माण झाला होता. तेथील सभासद, शेतकरी यांच्या मागणीची दखल घेऊन तो कारखाना घेऊन विलास कारखानामार्फत सहकारी तत्वावर चालविण्याचा निर्णय घेतला. कारखाना चांगला चालण्यासाठी त्यात तांत्रीक बदल करण्यात आले, अंतर्गत आधुनीकीकरण, विस्तीरीकरण करुन पुर्नजीवीत करण्यात आला. तेथे सर्वच गळीत हंगामात ऊसाचे विक्रमी गाळप केले, चांगल्या दर्जाच्या साखरेचे उत्पादन केले, चांगला साखर उतारा मिळवीण्याचे काम केले. येथील ऊसाला मराठवाडा विदर्भ विभागात सर्वांधीत ऊसदर देण्याचे काम केले. या यशस्वी कामगीरी बद्दल राज्याचे माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांचे या प्रसंगी सर्वांनी कौतुक केले.