पुणे : प्रतिनिधी
पुण्यात पौड भागात घोटोडे भागाच्या हद्दीत एका डोंगराजवळ हेलिकॉप्टर कोसळले. उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती आहे. हेलिकॉप्टरमध्ये ४ प्रवासी होते, त्यापैकी दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त हाती आले आहे. स्थानिकांनी अपघात स्थळी धाव घेत मदत केली.
पुणे जिल्ह्यातील पौड भागात हेलिकॉप्टर कोसळून अपघात झाला आहे. पुण्यात दिवसभर पावसाचा जोर होता. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर पडल्याचा अंदाज आहे. पोलिस घटनास्थळी पोहचले आणि बचाव यंत्रणाही दाखल झाल्या. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील पौड भागात गारवा हॉटेलजवळ एक हेलिकॉप्टर अचानक आकाशात गिरक्या खाताना दिसले. त्यानंतर आवाज झाला आणि हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळले. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये चार प्रवासी होते. त्यापैकी दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.