21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रनेपाळ दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना केंद्र,राज्य सरकार पूर्ण मदत करणार : पंतप्रधान मोदी

नेपाळ दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना केंद्र,राज्य सरकार पूर्ण मदत करणार : पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले आश्वासन

जळगाव : प्रतिनिधी
नेपाळमधील दुर्घटनेत मृत्यू झालेल्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांच्या कुटुबांना केंद्र व राज्य सरकार पूर्ण मदत करेल, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धीर दिला आहे. ते रविवारी, जळगावमध्ये लखपती दिदी मेळाव्यात बोलत होते.
पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीत केली. नेपाळ दुर्घटनेतील पीडित कुटुंबांच्या प्रती संवेदना व्यक्त केली.

घटनेनंतर भारत सरकारने त्वरित नेपाळ सरकारशी संपर्क साधला. मंत्री रक्षा खडसे यांना नेपाळला जायला सांगितले. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांचे पार्थिव विमानाने जळगावला आणण्याची व्यवस्था केली, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.
नेपाळ घटनेतील जखमींवर उपचार सुरू आहेत. ते लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो, असेही मोदी म्हणाले. घटनेतील पीडित कुटुंबांना केंद्र व राज्य सरकार पूर्णपणे मदत करेल, अशा शब्दात त्यांनी धीर दिला.

महिलांच्या सर्वांगीण विकासाला सर्वोच्च प्राधान्य – मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगावात होत असलेल्या लखपती दीदी मेळाव्यात महिलांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महिलांच्या सर्वांगीण विकासाला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे.

लाडकी बहीण योजनेमुळे महिला आनंदी आहेत. उज्वला योजना, जनधन योजना यामुळे महिलांच्या जीवनात अभूतपूर्व परिवर्तन होत आहे. पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनात शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

राज्यातील ५० लाख महिलांना लखपती दीदी बनविणार : अजित पवार

लखपती दीदी मेळाव्याच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला. महाराष्ट्रातील ५० लाख महिलांना लखपती दीदी बनविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जळगावात प्रचंड संख्येने आलेल्या महिलांकडून पंतप्रधानांचे स्वागत होत आहे. राजकीय जीवनात हे प्रथमच पाहत आहे. बाहेर पाऊस पडत आहे तरीही महिलांची संख्या मोठी आहे. राज्यात सर्वांच्या सहकार्याने ५० लाख महिलांना लखपती दिदी बनवायचा संकल्प करूया, असेही अजित पवार म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR