28.1 C
Latur
Friday, November 15, 2024
Homeमहाराष्ट्रमाजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची प्रकृती खालावली; लीलावती रुग्णालयात दाखल

माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची प्रकृती खालावली; लीलावती रुग्णालयात दाखल

मुंबई: प्रतिनिधी
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची प्रकृती खालावली आहे. अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने बाबा सिद्दीकी यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन दिवसांपासून ते लीलावती रुग्णालयात अ‍ॅडमिट आहेत. फूड पॉयझनिंग झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या बाबा सिद्दीकी यांची प्रकृती स्थिर आहे. सध्या त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

‘जन सन्मान यात्रा’मध्ये सहभागी
राष्ट्रवादी अजित पवार गटाची ‘जन सन्मान यात्रा’ सध्या सुरू आहे. ही ‘जन सन्मान यात्रा’ २० ऑगस्टला मुंबईत होती. यावेळी बाबा सिद्दीकी हे त्या यात्रेत सहभागी झाले होते. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळली. त्यांना विषबाधा झाली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ‘जन सन्मान यात्रे’त बाबा सिद्दीकी सहभागी झाले होते. यावेळी त्यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दीकी देखील या यात्रेत सहभागी झाले होते. महिलावर्ग मोठ्या प्रमाणात या यात्रेत सहभागी झाला होता. त्यानंतर बाबा सिद्दीकी यांची तब्येत खालावली. विषबाधा झाल्याने बाबा सिद्दीकी यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
बाबा सिद्दीकी हे मुंबईतील राजकीय वर्तुळातील मोठे नाव आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटात जाण्याआधी ते काँग्रेसमध्ये होते. १९९९ साली ते पहिल्यांदा वांद्रे पश्चिम या विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर २०१४ पर्यंत ते सलग या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. आघाडी सरकारमध्ये ते मंत्री देखील राहिले आहेत.

नोव्हेंबर २००४ ते डिसेंबर २००८ या काळात कामगार, अन्न नागरी पुरवठा, अन्न व औषध प्रशासन खात्याचे राज्यमंत्रिपद त्यांनी सांभाळले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी वांद्रे पश्चिम मतदारसंघ सोडून वांद्रे पूर्व मतदारसंघासाठी तयारी केली. पण ऐन निवडणुकीवेळी त्यांनी स्वत: या मतदारसंघातून न लढता त्यांचे पुत्र झिशान यांना मैदानात उतरवले. झिशान सिद्दीकी यांनी ही निवडणूक जिंकली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR