22 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रपावसाचा जोर वाढला

पावसाचा जोर वाढला

कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने पाऊस सक्रीय

नागपूर : प्रतिनिधी
राज्यात पावसाचा जोर वाढत असून उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात पावसाने ठाण मांडले आहे. सध्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. शनिवार आणि रविवारी कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस झाला. दरम्यान, हवामान खात्याने राज्यात २९ ऑगस्टपर्यंत पावसाचा मुक्काम राहील, असा अंदाज दिला आहे.

भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत राजस्थान, गुजरात, कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम मध्य प्रदेशात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, वायव्य झारखंड आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, ही प्रणाली मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात राज्याकडे येण्याची शक्यता आहे.

उत्तर बंगालच्या उपसागरात चक्राकार वा-यांच्या स्थितीमुळे नव्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. मान्सूनचा आस राजस्थानच्या जैसलमेरपासून कोटा, खजुराहो, व कमी दाबाचे केंद्र, रांची ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. गुजरातपासून महाराष्ट्राच्या किना-याला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातही जोरदार पाऊस होत आहे. रायगड जिल्ह्यासह पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर दोन दिवस रेड अलर्ट देण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR