23.9 C
Latur
Thursday, January 23, 2025
Homeक्रीडा८४ खेळाडू अन्‌ ९५ अधिका-यांसह पॅरिस पॅरालिंपिकसाठी भारताचे पथक रवाना

८४ खेळाडू अन्‌ ९५ अधिका-यांसह पॅरिस पॅरालिंपिकसाठी भारताचे पथक रवाना

पॅरिस : पॅरिस पॅरालिंपिकसाठी भारताचे पथक सज्ज झाले असून भारतीय पॅरा खेळाडूंच्या मदतीला यंदा ९५ विविध अधिकारी तैनात असणार आहेत. पॅरालिंपिकमध्ये भारताकडून ८४ खेळाडू पदक जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार असून त्यांच्या दिमतीला ९५ अधिकारी असणार आहेत. भारतीय पॅरालिंपिक समितीचे अध्यक्ष देवेंद्र झाझरिया यांच्यासह भारतीय खेळाडू रविवारी पॅरालिंपिकसाठी पॅरिसला रवाना झाले.

पॅरिस पॅरालिंपिकसाठी भारताचे पथक एकूण १७९ जणांचे असणार आहे. ९५ पैकी ७७ व्यक्ती या सांघिक अधिकारी असणार आहेत. वैद्यकीय टीममध्ये नऊ व्यक्तींचा समावेश आहे, तसेच नऊ व्यक्ती इतर अधिकारी म्हणून कार्यरत असणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR