गाझियाबाद – विवाहित महिला, तिघांसोबत अफेअर त्यानंतर एका प्रियकराचा निर्दयी खून…ही कहाणी गाझियाबादमधल्या ३५ वर्षीय इंटीरियर डिझाईनरची आहे. तरुण पवारच्या हत्येनं पोलिसही हैराण झाली आहे. तरुण ज्या अंजली नावाच्या महिलेवर प्रेम करायचा तिचा या हत्येत समावेश आहे. या महिलेनेचं तिच्या डोळ्यादेखल तरुणला मरताना पाहिले. कित्येक तास अंजली तिच्या दुसऱ्या प्रियकरासोबत तरुणच्या मृतदेहाजवळ बसली. रात्र झाल्यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली.
तरुण पवार ज्या अंजलीवर प्रेम करायचा तिचे बहिणीच्या नवऱ्यासोबतही अफेअर होते. तिच्या बहिणीचा नवरा अक्षय आणि अन्य लोकांशीही अंजली बोलायची. जेव्हा अंजली आणि तरुण यांची जवळीक वाढली तेव्हा त्याला वाटेतून बाजूला करण्याचा प्लॅन शिजला. या प्लॅनमध्ये स्वत: अंजलीही सहभागी झाली. १६ ऑगस्टच्या दरम्यान तरुण पवार हा अचानक बेपत्ता झाला होता. त्याच्या कुटुंबाने पोलीस स्टेशनला याची तक्रार नोंदवली. तरुणचे कुणीतरी अपहरण केले असावे असा कुटुंबाला संशय होता. मात्र तपास सुरू होताच जे सत्य समोर आले ते ऐकून पोलिस अधिकारी, कर्मचारीही अवाक् झाले.
तरुणची इतकी निर्दयी हत्या करण्यात आली की अद्याप त्याचा पूर्ण मृतदेह पोलिसांना सापडला नाही. गुन्हेगारांनी आधी तरुणला बेदम मारहाण केली. त्यानंतर बेशुद्ध अवस्थेत तरुणचा गळा दाबून खून करण्यात आला. कारमधून त्याचा मृतदेह शहराबाहेर बुलंदशहराला घेऊन गेले. तिथे त्याच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि नदी, जंगलात फेकून दिले. पाय, डोके, हात वेगवेगळे असल्याने मृतदेहाची ओळख पटली नाही. तरुणची हत्या अंजली, तिचा प्रियकर अक्षय आणि इतर मित्रांनी केली. सर्वात आधी इंटिरियर कामाच्या बहाण्याने तरुणला बोलवण्यात आले. त्यानंतर त्याची हत्या केली.
दरम्यान, तरुण ज्या अंजलीच्या प्रेमात पडला होता तिचे संबंध तिच्या भावोजीसोबतही होते इतकेच नाही तर गुन्हेगारांमधील पवन नावाच्या युवकासोबतही अंजलीचे संबंध होते. अंजलीचे पतीसोबत घटस्फोटाचे प्रकरण कोर्टात सुरू आहे. तरुणला अंजलीची जवळीक भावोजी आणि पवनला आवडत नव्हतं. त्यातूनच तरुणला मारण्याचा कट रचण्यात आला. अनैतिक संबंधातून ही हत्या करण्यात आली असून या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी पवन, वंश आणि अंजलीला अटक करण्यात आली आहे. तर इतर ६ आरोपींचा पोलीस शोध घेत आहे.