26.6 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रम्हाडाच्या इमारतीची कंपाऊंड भिंत कोसळली, दोन जण ठार

म्हाडाच्या इमारतीची कंपाऊंड भिंत कोसळली, दोन जण ठार

मुंबईतील चर्नी रोड पूर्व येथे घडली दुर्घटना

मुंबई : मुंबईतील चर्नी रोड पूर्व येथील म्हाडाच्या इमारतीची कंपाऊंड भिंत कोसळल्याची घटना घडली. या दुर्दैवी घटनेत दोन मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर, एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमीवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्व मजूर गांधी चाळीतील नाला साफ करत असताना सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी खासगी कंत्राटदाराने गल्ली साफ करण्यासाठी तीन मजूर ठेवले होते. यावेळी गल्लीची साफसफाई करत असताना अचानक एक कंपाऊंड भिंत दोघांच्या अंगावर कोसळली. त्यात ते ढिगा-याखाली अडकले होते. घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापक पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचाव कार्य सुरू झाल्यानंतर दोघांना ढिगा-याखालून काढण्यात आले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान दोघांचा मृत्यू झाला अशी माहिती मिळाली.

दरम्यान, बीएससीच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुस-या फणसवाडीतील दादीशेठ अग्यारी लेनवरील गांधी इमारतीपासून सुमारे ५-७ फूट उंच आणि ३० फूट लांबीची कंपाऊंड भिंत कोसळली. ही घटना दुपारी २.३० च्या आसपास घडली. घटनेनंतर परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. निषाद (३०), रामचंद्र सहानी (३०) अशी मृतांची नावे आहेत. तर सनी कनोजिया (१९) यांना जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे बीएमसी अधिका-यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR