नागपूर : पावसाळ्यात अनेक संसर्गजन्य आजार बळावत आहेत. त्यात नागपुरात चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. शहरात गेल्या २६ दिवसांत २४६ चिकनगुनिया रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
महापालिकेकडून चिकनगुनिया, डेंग्यूवर नियंत्रणासाठी अनेकस्तरांवर प्रयत्न करण्यात येत आहेत. यातील एक म्हणजे शहरातील घरांचे सर्वेक्षण करून डास अळीवर नियंत्रण आणणे. गेल्या महिनाभरापासून महापालिकेने दहाही झोनमध्ये सर्वेक्षण सुरू केले आहे.