23.5 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeक्रीडाजय शाह आयसीसीच्या अध्यक्षपदी

जय शाह आयसीसीच्या अध्यक्षपदी

अध्यक्षपदी बिनविरोध निवड १ तारखेपासून कारभार सांभाळणार

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष झाले आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांची या पदासाठी जोरदार चर्चा सुरू होती. आज नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी इतर कोणी अर्ज न केल्याने जय शाह यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला. विशेष बाब म्हणजे १६ पैकी १५ सदस्यांचा शाह यांना पाठिंबा होता.

पण, शाह यांची बिनविरोध निवड झाल्याने आयसीसीला सर्वात तरुण अध्यक्ष मिळाला आहे. खरे तर जय शाह २०१९ मध्ये पहिल्यांदा बीसीसीआयचे सचिव बनले. त्यानंतर २०२२ मध्ये दुस-यांदा त्यांच्याकडे ही जबाबदारी आली. २०२५ मध्ये त्यांच्या या पदाचा कार्यकाळ संपुष्टात येणार होता. आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ ३० नोव्हेंबरला संपत आहे. भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी म्हटले होते की, जय शाह यांनी या पदाची जबाबदारी स्वीकारल्यास जगभरातील क्रिकेटसाठी फायद्याचे ठरेल.

जय शाह हे १ डिसेंबरपासून आयसीसीच्या अध्यक्षपदाचा कारभार सांभाळतील. ३५ वर्षीय शाह हे आयसीसीच्या इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष झाले आहेत. विशेष बाब म्हणजे ते आयसीसीचे अध्यक्ष झाल्याने बीसीसीआयच्या सचिवपदी कोणाची वर्णी लागते याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR