लातूर : प्रतिनिधी
विलासरत्न वलासराव देशमुख यांच्या प्रेरणेने लातूर ग्रामीणचे लोकप्रिय आमदार धीरज देशमुख यांनी गेल्या पाच वर्षांत लातूर ग्रामीणच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणला आहे. या निधीतून रस्ते, आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणात निर्माण करता आले आहेत. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपले आमदार धीरज देशमुख यांना लातूर ग्रामीणचा विकास केला आहे, असे प्रतिपादन विलास सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रीमती वैशालीताई देशमुख यांनी केले.
लातूर तालुक्यातील रमजानपुर व बोकनगाव येथे दि. २७ ऑगस्ट रोजी महिला बचत गटांचा मेळावा घेण्यात आला. त्याप्रसंगी बचत गटांच्या महिलांना संवाद साधताना श्रीमती वैशालीताई देशमुख बोलत होत्या. यावेळी रीड लातूरच्या अध्यक्षा सौ. दीपशिखा धीरज देशमुख यांच्यासह डॉ. सारिका देशमुख, सुनिता अरळीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
लातूर तालुक्यातील रमजानपूर येथे हनुमान मंदीर सभागृहात बचत गटांच्या महिलांची बैठक झाली. यावेळी झालेल्या बैठकीत बोलतांना श्रीमती वैशालीताई विलासराव देशमूख म्हणाल्या, ग्रामीण भागातील मुल्ं इंग्रजी भाषा अभ्यासासाठी घाबरतात. इंग्रजी ही ज्ञान भाषा आहे. ती ग्रामीण भागातील शेतक-यांच्या मूलांना आली पाहीजे. यासाठी पहिलीपासून इंग्रजी भाषा शिकवली पाहिजे, असा निण्य विकासरत्न विलासराव देशमूख मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतला होता. या अनुशंघाने त्यावेळी इंग्रजी विषय हा पहिली पासून सुरु झाला आहे. आज रीड लातूच्या माध्यमातून दीपशीखा धीरज देशमूख ग्रामीण भागातील मुलांना पुतस्के देऊन मदत करीत आहेत.
विकसरत्न विलासराव देशमूख यांनी या भागाचा आणि या भागातील लोकांच्या विकासात योगदान दिले आहे. आज माजी मंत्री दिलीपराव देशमूख यांच्या मार्गदर्शनांने माजी मंत्री आमदार अमित देशमूख व आमदार धीरज देशमूख हेच काम पुढे घेऊन जात आहेत. आज या बैठकीच्या माध्यमातून आपल्याला भेटता याव व संवाद साधता आला पाहिजे यासाठी आलो आहोत., असेही त्या म्हणाल्या. सुत्रसंचालन विजयकुमार गुत्ते यांनी केले.
बोकनगाव येथील महादेव मंदिर सभागृहात बचत गटांच्या महिला मेळावा झाला. यावेळी श्रीमती वैशालीताई देशमुख यांनी महिलांशी संवाद साधला. लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख हे लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आहेत. त्यामुळे या बँकेच्या माध्यमातून महिलांकडून एक रुपयाही न घेता जिल्हा बँकेच्यामार्फत जवळपास २५ हजार महिलांना खाते काढून दिले आहे तसेच जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतक-यांना पाच लाखापर्यंत बिनव्याजी कर्जाची सुविधा उपलब्ध करुन दिले आहे या सर्व सुविधा राबवत लातूर ग्रामीणचे लोकप्रिय आमदार धीरज देशमुख यांनी ग्रामीण भागातील विकास कामाचा ध्यास घेतला आहे. त्यामुळे आपण तमाम मतदारांनी पुन्हा संधी देऊन धीरज देशमुख यांना सर्वाधिक मतांनी निवडून आणावे, असे आवाहन केले.
यावेळी रमजानपूर येथील महिला बचत गटांच्या मेळाव्यात इंदरबाई सोमवंशी, चित्रलेखा पावडे, मंगलबाई जेवळे, श्रीमती काळे आदी महिलांची उपस्थिती होती. तर बोकनगाव येथील महिला बचत गटांच्या मिळाव्यास गावच्या सरपंच सुरेखा स्वामी, उपसरपंच किशोर दाताळ, संचालक बंडू शिंदे, संचालक धनराज दाताळ, सचिन दाताळ, पंडित दाताळ, मुरलीधर दाताळ, गुरुलिंग स्वामी, कल्पना शिंदे, संध्या दाताळ, उषा स्वामी, प्रगती दाताळ, रुक्मिणी वाघमारे, रंजना गोरे, प्रेमलता दत्ता, चंद्रकला कांबळे, संगीता कांबळे, ताहिरा, अश्विनी दाताळ, पार्वती दाताळ, मीरा माने, राधिका दाताळ, सोजरवाई चव्हाण यांच्यासह महिला उपस्थित होते.