पुणे : प्रतिनिधी
ज्येष्ठ नाट्य, चित्रपट अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचे येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्या ८१ वर्षाच्या होत्या. गेली ७० वर्षे त्यांनी अतुलनीय अभिनयाने मराठी कला क्षेत्रावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे.
वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी कला क्षेत्रात प्रवेश केला. नाट्य, चित्रपट आणि नृत्य क्षेत्रात त्यांनी आपल्या कलेचा ठसा उमटविला. चित्रपटात १०० पेक्षा अधिक भूमिका केल्या. कला क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.