सोलापूर : सोलापूर जिल्हा हमाल-मापाडी माथाडी श्रमजीवी कामगार समन्वय समितीने विविध मागण्याच्या संदर्भात बुधवार रोजी बाजार समितीच्या मुख्य कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व हमाल-मापााडी,माथाडी स्त्री माथाडी कामगारांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी समन्वय समितीने धरणे आंदोलन केले.
माथाडी कामगारांची नोंद बाजार समितीकडून केली जात नाही.माथाडी कामगारांच्या पगाराची कोणतीही जबाबदारी बाजार समिती घेत नसून बाजार समितीकडे तक्रार केल्यास तक्रार निवरणास ही विलंब केला जातो.बाजार समिती करिता व बाजार समितीच्या विकासांसाठी माथाडी कामगारांच्या पिढ्यान पिढ्या उद्धवस्त झाल्या परंतु बाजार समितीने माथाडी कामगारांच्या मुलभूत सुविधा करिता कोणतेही काम केले नाही. आज तागायत कित्येक कामगार भाडयाच्या घरात राहत असून त्यांना हक्काचे घर नाही किंवा कित्येक कामागर बाजार समितीमध्ये धुळ व धूर यांमुळे टी.बी. सारख्या आजाराने बळी पडले आहेत.त्यांच्या प्राथमिक उपचाराकरिता बाजार समितीने कोणतीही सोय केली नाही. कामगाराच्या समस्यां चे निवारण करून मागण्या मान्य करावे या साठी समन्वय समितीकडून धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी बाजार समितीचे प्रशासक मोहनराव निंबाळकर,सचिव दत्तात्रय सूर्यवंशी ,सी.ए. बिराजदार यांनी माथाडी कामगारांच्या मागण्याचे निवेदन स्वीकारले. प्रशासक निंबाळकर यांनी माथाडी कामगाराच्या समस्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. यावेळी बाजार समितीमधील माथाडी कामगार व महिला कामगार मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. दरम्यान समितीचे अध्यक्ष शिवाजी शिंदे, संचालक शिवानंद पुजारी, उपाध्यक्ष भिमा सिताफळे, अध्यक्ष सिध्दाराम हिप्परगी, सचिव दत्ता मुरुमकर, संघटक गफ्फार चांदा, राजशेखर काळगी, किरण मस्के, महेंद्र चंदनशिवे, गुरुशांतय्या पुराणिक, सुनिता रोटे, यशोदा गायकवाड, राजू दणाने, विशाल मस्के, हब्बू जमादार, शिवलिंग शिवपुरे, दत्ता बसवेश्वर, नागनाथ खंडागळे, इरफान पिरजादे, शिवानंद जमादार आदींची उपस्थिती होती.