26.1 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeराष्ट्रीयरा. स्व. संघाचे सरसंघचालकांच्या सुरक्षेत वाढ

रा. स्व. संघाचे सरसंघचालकांच्या सुरक्षेत वाढ

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत अ‍ॅडव्हास सेक्युरिटी लाईजनच्या (एएसएल) संरक्षणाखाली असतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही अशीच सुरक्षा मिळते. आयबीने मंत्रालयाला आलेल्या धमक्यांशी संबंधित विश्लेषण अहवाल सादर केला. त्याआधारे १६ ऑगस्ट रोजी नवीन निर्देश जारी करण्यात आले. पूर्वी एएसएल प्रोटोकॉल वापरला जात असे. सध्या भागवत सीआयएसएफच्या झेड प्लस सुरक्षा कवच मिळवणा-यांपैकी आहेत. नवीन सुरक्षा अपडेटसह सध्या सीआयएसएफद्वारे प्रदान केलेली सुरक्षा अधिक अपडेट केली जाईल.

एएसएल सिक्युरिटीमध्ये स्थानिक एजन्सींना केंद्रीय सुरक्षा दलांशी जोडण्यासाठी प्रोटोकॉल आहे. आयबीने अहवालात अशा राज्यांचा उल्लेख केला आहे, जिथे भाजपचे सरकार नाही. भागवत यांना कट्टरपंथी इस्लामिक गटांव्यतिरिक्त इतर संघटनांकडून धोका असल्याचे अहवालात म्हटले आहे.
महाराष्ट्रातील मराठा आरक्षणविरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने २१ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनाही झेड प्लस सुरक्षा दिली होती. त्यांच्या सुरक्षेसाठी आता १० अतिरिक्त सीआयएसएफ जवान तैनात करण्यात आले आहेत. त्यावर २२ ऑगस्ट रोजी शरद पवार यांनी केंद्रावर हेरगिरीचा आरोप केला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR