22.8 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रमोदीजी म्हणजे हात लावेल तिकडे सत्यानाश!

मोदीजी म्हणजे हात लावेल तिकडे सत्यानाश!

मुंबई : काल आपण मालवणला गेलो होतो, मी नाही पण तुम्ही सगळे आणि आदित्य गेला होता. आपण काय तिकडे राडा करायला गेलो नव्हतो. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ८ महिन्यांत पडतो. पूर्वी दादा कोंडकेंचा सिनेमा होतो, बोट लावेल तिथे गुदगुल्या. आता मोदी नवा काढतायत हात लावेल तिकडे सत्यानाश…जिकडे हात हात लावेल तिकडे सत्यनाथ झालाच पाहिजे, ये मोदी की गॅरंटी आहे. अशा सडक्या गॅरंट्या आपल्याला नको आहेत असे ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. मुंबई उपनगरमधील गणेशोत्सव समन्वय समिती मार्गदर्शन सभेत ते बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, मधल्या काही वर्षात आपली भेट झाली नव्हती. ५ वर्ष किमान भेट न होऊन झाली. बाप्पाच्या आधी तुमची भेट व्हायची. मात्र तुम्ही नातं तुटू दिलं नाही. मी तुम्हाला हक्काने बोलवलंय, काही सांगण्यासाठी बोलवले आहे. आपण गणपती उत्सव म्हणून साजरा करतो. पालिका बरखास्त केली, राज्याला कोणी वालीच राहिलेला नाही. आपण वॉर्ड अधिका-याकडे जायचो आणि प्रश्न सुटायचे. विसर्जनाच्या बॅनर्सवर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांचे फोटो असतात. ते सांकेतिक सांगतायत कोणाचे विसर्जन केले पाहिजे.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मी जरा अडचणींचा पाढा वाचला, मात्र सोडवणार कोण? सण उत्सवावर आपण कोरोनात बंदी केली होती. मात्र काहींच्या अंगात शिरते. गणपती बुद्धीदाता देखील होता, थोडी बुद्धी तर घ्यायची. जर कोणी बंधने आणली तर झुगारुन द्या. आपण खड्डे बुजवले होते, यांच्या कारभारालाच खड्डे पडलेत ते कोण बुजवणार? नायक सिनेमामध्ये तो एक टाईप रायटर होता. त्या सिनेमात लोकांना आणायचे आणि सांगायचे याला आत टाक त्याला टाक. मात्र इथे तो टाईप रायटर म्हणायचा साहेब हा आपलाच कार्यकर्ता मग काय करायचे. अरे तू फक्त टाइप कर रे. कारवाईचे नंतर बघू. पाहणी वगैरे सर्व थोतांड आहे असेही ठाकरे म्हणाले.

लोकमान्यांनी स्वातंत्र्यांची चळवळ केली आणि आपण त्याचा उत्सव केला. ही शक्ती जागी केली पाहिजे यासाठी टिळकांनी प्रयत्न केलेत. लोकमान्यांनी स्वातंत्र्यांची चळवळ केली आणि आपण त्याचा उत्सव केला. ही शक्ती जागी केली पाहिजे यासाठी टिळकांनी प्रयत्न केलेत. स्वातंत्र्य मिळाले पण सरकार आता आहे की नाही हेच कळत नाही. लालबागचा राजा, गणेशगल्लीचा राजा वेगळी ओळख आहे. शाडूची मूर्ती पण करतो, माती द्या. जशी ही जबाबदारी घेतो तशी तुम्ही छत्रपतींच्या पुतळ्याची जबाबदारी का नाही घेतली? एकमेकांकडे तुम्ही बोट दाखवता, नौदल म्हणते पीडब्ल्यूडीने केला ते म्हणतात त्याने केला हेच सुरु आहे असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR