28.9 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रशरद पवारांनी ‘झेड प्लस’ सुरक्षा नाकारली!

शरद पवारांनी ‘झेड प्लस’ सुरक्षा नाकारली!

नवी दिल्ली : शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा प्रस्ताव केंद्राच्या गृह विभागाने मांडला आहे. यानिमित्त दिल्लीतील पवारांच्या निवासस्थानी गृह विभागाच्या अधिका-यांची बैठक पार पडली. या बैठकीत विविध गोष्टींवर चर्चा झाली. पण शरद पवारांनी झेड प्लस सुरक्षा नाकारली असल्याची माहिती मिळाली आहे.

शरद पवार यांच्या निवासस्थानी सीआरपीएफया अधिका-यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत आपल्याला अतिरिक्त सुरक्षेची आवश्यकता नसल्याचे पवारांनी अधिका-यांना सांगितले. तसेच जी काही सुरक्षा व्यवस्था द्यायची असेल ती घराच्या बाहेर रहू द्या. गाडी बदलणे, गाडीत २ सुरक्षा रक्षक असण्याला त्यांनी नकार दिला आहे. दरम्यान, सुरक्षा देण्याचे कुठलेही कारण शरद पवार यांना अधिका-यांनी सांगितलेले नाही. त्यामुळे खुद्द शरद पवारचे सुरक्षेबाबत अनभिज्ञ आहेत. नेमकी सुरक्षा रक्षकांकडे अशी कुठली माहिती आहे, ज्यामुळे शरद पवारांच्या जीवाला धोका असू शकतो. हे खुद्द पवारांनाच सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे मला झेड प्लस सुरक्षेची गरज नसल्याचे शरद पवार यांनी या अधिका-यांना सांगितल्याचे कळते आहे. शरद पवारांच्या सुरक्षेचा मुद्दा हा गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत आहे.

सुळेंनीही केली होती विनंती
बदलापूर इथे घडलेल्या शाळेतील चिमुकल्या मुलींवरील अत्याचाराच्या घटनेनंतर पवारांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती की, माझी सुरक्षा व्यवस्था काढून घ्या. कारण राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडत चालली आहे. पोलिसांवर प्रचंड ताण आहे, त्यामुळे माझी सुरक्षा व्यवस्था तातडीने काढून घेण्यात यावी.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR