नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने हरियाणा निवडणुकीच्या तारखांमध्ये बदल केले आहेत. आयोगाने हरियाणातील मतदानाची जाहीर केलेली तारीख १ ऑक्टोबर बदलून ५ ऑक्टोबर केली आहे.
याचबरोबर जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीची तारीख ४ ऑक्टोबरवरुन ८ ऑक्टोबर करण्यात आलेली आहे. जम्मू काश्मीरमध्ये मतदानाच्या तारखेत कोणतेही बदल केलेले नाहीत. भाजपसह अनेक राजकीय पक्षांनी हरियाणातील निवडणुकांच्या तारखांमध्ये बदल करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानंतरच आयोगाने तारखेत बदल केले आहेत. निवडणूक आयोगाने याबाबत माहिती देताना सांगितले की, बिश्नोई समाजाच्या मतदानाचा अधिकार आणि परंपरा या दोहोंचा सन्मान ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.