भेटा : प्रतिनिधी
औसा तालुक्यातील भेटा येथील प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी भेटा, भादा गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच भेटा येथे कॅन्डल मार्च व मुक मोर्चा काढून पिडीतांना न्याय द्यावा व आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी भेटाकरांच्या वतीने करण्यात आली.
प्रामुख्याने भादा येथील गावक-यांकडून औसा-भादा-भेटा रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. सदरील घटनेची एसआयटी चौकशी तात्काळ करावी, सदरील प्रकरण अती जलद न्यायालयात चालविण्यात यावे, या नंतर अशा घटना होऊ नयेत म्हणून भादा पोलीसांचा दक्षता म्हणून पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व गावामध्ये किमान एक तरी राउंड झाला पाहिजे.अशा मागणीचे भादेकरांच्या व भेटाकरांच्या वतीने पोलिस निरीक्षक राजकुमार भोळ यांना निवेदन देण्यात आले.
भेटा गावात बलात्कार करून खून केलेल्या प्रकरणातील महिलेच्या आत्म्यास चिरशांती मिळावी म्हणून बोरगाव मध्ये कॅन्डल मार्च व मुक मोर्चा काढण्यात आला. या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी पुढील कार्यवाही कडक पध्दतीने करण्यात यावी व पिडीत कुटुंबाना न्याय द्यावा. अशी मागणी सर्व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली.