19.6 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeलातूरकत्तल करण्यासाठी क्रूरपणे बांधलेल्या गायी आढळल्या

कत्तल करण्यासाठी क्रूरपणे बांधलेल्या गायी आढळल्या

जळकोट : प्रतिनिधी
जळकोट शहरातील डांगेवाडी जिल्हा परिषद शाळेच्या जवळ तीन गाई व तीन कालवडी असे एकूण सहा गायी कत्तल करण्यासाठी चारा पाणी न करता क्रूरपणे बांधलेली आढळून आली. याप्रकरणी जळकोट पोलिसांनी एका आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळकोट येथील शिंदे गटाचे शिवसेनेचे कार्यकर्ते तथा शहर प्रमुख बालाजी थोटे, सचिन भोसले देवा कल्याण कस्तुरे, जयवंत धूळशेट्टे, परमेश्वर नामवाड, रत्नाकर केंद्रे, वैभव मोहटे, कृष्णा सुरनर , बलराज नाईकवाडे, राहुल मुसळे यांना जळकोट शहरांमध्ये गाईंची कत्तल करण्यासाठी डांगेवाडी परिसरामध्ये तीन गाई व तीन कालवड बांधून ठेवल्याची माहिती मिळाली होती. यानंतर याची सर्व माहिती त्यांनी जळकोट येथील पोलिसांना दिली.
  यानंतर तात्काळ जळकोट पोलीस घटनास्थळी पोहोचले व यांना कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवलेली व चारा पाणी न करता क्रूरपणे बांधलेली गाई आढळून आल्या. यावेळी सर्व गाईंना पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले व यानंतर ही सर्व जनावरे पुढील कारवाई होईपर्यंत संगोपन करण्यासाठी घोणशी येथील जगदंबा फाउंडेशन व वर्धिनी गोशाळा येथे पाठवण्यात आले आहेत.
जळकोट पोलीस स्टेशनमध्ये आरोपी शफी खुरेशी रा. जळकोट याचे विरुद्ध  हेड कॉन्स्टेबल पद्माकर जायभाये यांच्या फिर्यादीवरून कलम ११ (१) (ड), (ई) प्राण्यास निर्देश प्रतिबंध कायदा १९६० व सह कलम ५ (अ), ५ (ब) ९, ११ महाराष्ट्र पशु संरक्षण सुधारणा अधिनियमन १९९६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नागरगोजे लक्ष्मण हे करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR