कोल्हापूर : प्रतिनिधी
जिल्ह्यात ‘लम्पी’ आजाराने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली असून, शिरोळ तालुक्यातील ‘कोथळी’, ‘उमळवाड’ येथील जनावरे बाधित झाली आहेत. एक जनावर दगावले आहे.
दीड वर्षापूर्वी आलेल्या लाटेत तब्बल १२८० जनावरे मृत्युमुखी पडल्याने ‘लम्पी’चा ताप गार्यांना आला असला तरी घाम मात्र पशुपालकांना फुटला आहे. गायवर्गीयगाय, बैल, वासराला ‘लम्पी’ची लागण होते.
म्हशींच्या तुलनेत गायवर्गीय प्राण्यात रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने लागण लवकर होते. महाराष्ट्रात सप्टेंबर २०२२ पासून लम्पीची लागण झाली आणि वर्षभर शेतक-यांचे गोठे मोकळे झाले.
वर्षभरात हातकणंगले, शिरोळ, करवीर, राधानगरी, भुदरगड, कागल, पन्हाळा तालुक्यातील ५० हजारांपेक्षा अधिक जनावरांना त्याची लागण झाली, होती. शासन व ‘गोकुळ’ने प्रतिबंधक लसीकरण केले, लसीकरण केले तरी काही जनावरांना नव्याने लागण झाली.