25.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeक्रीडामहिलांच्या ४०० मीटर शर्यतीत दीप्ती जीवनजीला कांस्यपदक

महिलांच्या ४०० मीटर शर्यतीत दीप्ती जीवनजीला कांस्यपदक

पॅरिस : पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेतील सहावा दिवस भारतीयांसाठी काही खास राहिला नाही. पण, रात्री भारताचे आजच्या दिवसातील पदकाचे खाते उघडले आणि दीप्ती जीवनजीने महिलांच्या ४०० मीटर टी २० शर्यतीत ५५.८२ सेकंदाची वेळ नोंदवून कांस्यपदक नावावर केले. भारताचे हे पॅरालिम्पिक स्पर्धेतील १६वे पदक ठरले. २० वर्षीय दीप्ती ही भारतासाठी ट्रॅक अँड फिल्डमध्ये पदक जिंकणारी युवा खेळाडू ठरली आहे.

नेमबाजीत ५० मीटर थ्री पोझिशन एसएच१ मध्ये अवनी लेखराने सातव्या क्रमांकासह अंतिम फेरीत प्रवेश मिळवला, तेच मोना अगरवाल अपयशी ठरली. पण, फायनलमध्ये अवनीला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. महिलांच्या गोळाफेक एफ३४ फायनलमध्ये भाग्यश्री जाधव पाचवी आली. तिरंदाजीत पूजाने वैयक्तिक रिकर्व्ह गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला खरा, परंतु तिचा प्रवास तिथेच संपला.

महिलांच्या ४०० मीटर टी२० फायनलमध्ये दीप्ती जीवंजीकडून भारताला सुवर्णपदकाच्या आशा होत्या. या स्पर्धेतील वर्ल्ड रेकॉर्ड कालपर्यंत दीप्तीच्या ( ५५.०७ सेकंद) नावावर होता, काल टर्कीच्या एसेल ओंडरने ५४.९६ सेकंदाची वेळ नोंदवून तो स्वत:च्या नावावर केला. मागील दोन वर्षांत तिने घवघवीत यश मिळवले आहे. २०२३ च्या आशियाई स्पर्धेत तिने आशियाई रेकॉर्डसह सुवर्णपदक जिंकले, तर २०२४ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत वर्ल्ड रेकॉर्ड मोडून सुवर्ण जिंकले होते.

दीप्तीचा जन्म तेलंगणातील वारंगल जिल्ह्यातील कल्लेडा गावात झाला. तिचे आईवडील, जीवनजी यादगिरी आणि जीवनजी धनलक्ष्मी यांच्याकडे दीड एकर शेतजमीन होती आणि ते इतरांच्या शेतात रोजंदारी मजूर म्हणून काम करायचे. तिला पुलेला गोपीचंद यांनीही पाठिंबा दिला. ज्यांनी हैदराबाद येथील बौद्धिक अपंगत्व असलेल्या व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय संस्थेत तिची चाचणी घेण्याचे सुचवले. त्यानंतर ती पॅरा खेळाडू म्हणून स्पर्धेत सहभाग घेऊ लागली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR