मुंबई : एसटी कर्मचा-यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचारी संपावर गेल्याने चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले आहेत. तर खासगी बसचालकांचे चांगलेच फावले आहे.
कर्मचारी कृति समितीची मुख्यमंत्र्यांसोबत आज बैठक घेणार आहेत. या बैठकीत संपावर तोडगा निघेल का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
एसटी कर्मचा-यांच्या मागण्या याआधीही मान्य झाल्या होत्या. मात्र त्या अमलात आणल्या गेल्या नाहीत असा दावा कर्मचा-यांनी केला आहे. सरकार फक्त आश्वासनाचे गाजर दाखवत असल्याचा आरोप संप करणा-या कर्मचा-यांनी केला आहे. एसटी कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी संपावर गेले आहेत. त्यांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे.
कर्मचारी कृति समितीची मुख्यमंत्र्यांसोबत आज बैठक होणार आहे. या बैठकीत संपावर तोडगा निघेल का याकडे संपूर्ण राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. ‘वर्षा’ निवासस्थानी संध्याकाळी ७:०० वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीत एसटी कर्मचा-यांच्या प्रलंबित मागण्यांवर चर्चा होणार आहे. एसटी कर्मचा-यांना सरकारी कर्मचा-यांप्रमाणे वेतन मिळावे अशी मागणी कर्मचा-यांची आहे. काल उद्योगमंत्री उदय सामंत यांनी समितीच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा केली होती.
चर्चेतून मार्ग न निघाल्यास आंदोलन तीव्र होणार असल्याचे एसटी कर्मचा-यांच्या संघटनेने म्हटले आहे. सरकार मागण्यांबाबत सकारात्मक असून सणासुदीच्या काळात आंदोलन करून प्रवाशांची गैरसोय करू नये, असे आवाहन सामंत यांनी केले. मात्र मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेण्यास संघटनेने नकार दिल्यामुळे बैठकीत तोडगा निघू शकला नाही.
एसटी कर्मचा-यांच्या मागण्या
खाजगीकरण बंद करा,
सुधारित जाचक शिस्त, आवेदन कार्यपद्धती रद्द करा
इनडोअर, आऊटडोअर मेडिकल कॅशलेस योजना लागू करा, जुन्या झालेल्या बस काढून टाका, स्वमालकीच्या नवीन बस खरेदी करा, चालक, वाहक, कार्यशाळा कर्मचा-यांना अद्ययावत विश्रांतीगृह द्या, वेळापत्रकातील त्रुटी दूर करा, सेवानिवृत्त कर्मचा-यांना निवृत्तिवेतन द्या,
सर्व क्षेत्रीय कार्यालयांत संयुक्त घोषणापत्रानुसार दुरुस्ती करा, एसटी कर्मचा-यांच्या कुटुंबियांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये वर्षभराचा मोफत पास द्यावा.