21.2 C
Latur
Sunday, December 22, 2024
Homeछत्रपती संभाजीनगर९ सप्टेंबरपासून एमआयएम उमेदवारी अर्ज वाटप करणार

९ सप्टेंबरपासून एमआयएम उमेदवारी अर्ज वाटप करणार

छत्रपती संभाजीनगर : लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत असलेले छोटेमोठे पक्ष आता बाहेर पडू लागले आहेत. यात एमआयएमचाही समावेश आहे. आघाडीचे नेते प्रतिसादच देत नसल्याने एमआयएमने स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असून याकरिता पक्षाच्यावतीने राज्यभर मेळावे घेण्यात येत आहेत. ९ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्जाचे वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी सांगितले ते येथील एमआयएमतर्फे आयोजित महिलांच्या मेळाव्याप्रसंगी उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पाठिंबा देणे आमची राजकीय मजबुरी होती. मुस्लिम समाजाच्या विरोधात कायम भूमिका घेणारे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्हाला जायचे नव्हते. दुसरीकडे भाजपचा पराभव करायचा होता. विधानसभेतही आमची हीच भूमिका आहे. मात्र, आघाडीचे नेते प्रतिसाद देत नसल्याने स्वबळावर लढणे हा आमचा नाईलाज आहे असे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी सांगितले. पक्षातर्फे स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यासोबतही चर्चा झाली होती. आंबेडकर यांच्यासोबत जायचे नाही असा निर्णय घेतला आहे. भाजपचा पराभव करायचा आहे. मात्र महाविकास आघाडीचे नेते आम्हाला विचारात घ्यायला तयार नाहीत. यापूर्वी आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा झाली. त्यांनी वेळ मागून घेतला. त्यानंतर बोलणे बंद केले. यावरून त्यांना आता आमची गरज नाही असे दिसते. आमची २५ जागांची ताकद असेल तर आम्ही २५ जागाच मागू, आम्ही शंभर जागांवर चर्चा करणार नाही. महाविकास आघाडीत तीन खुर्चा आहे. चौथी खुचों लावून त्यांना आम्हाला बाजूला बसवायचे नाही असेही जलील म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR