18.1 C
Latur
Sunday, December 22, 2024
Homeलातूरनीट प्रकरणातील आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला

नीट प्रकरणातील आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला

लातूर : प्रतिनिधी
देशभरातील बहुचर्चित नीट पेपर लीक व फसवणूक प्रकरणी लातुरातील दाखल गुन्ह्याचा तपास करणा-या सीबीआय पथकातील अधिका-यांनी लातूरात परत दाखल होत या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपी विरोधात दोषारोप पत्र दाखल करताच व सीबीआयकडून दोषारापत्र दाखल होताच मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी हे प्रकरण बोर्डावर घेतले आहे. ज्यांच्या विरोधात सिबीआयने  दोषारोपत्र दाखल केले आहे त्या न्यायालयीन कोठडीतील आरोपींनी त्यांचेकडे जामीनासाठी अर्ज केला होता. त्या आरोपींचा जामीन अर्ज फेटाळल्याचा निर्णय मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती चव्हाण यांनी सोमवारी दिला आहे.
  जलील पठाण, संजय जाधव व एन. गंगाधरप्पा यांच्यातील मध्यस्थ इरन्ना मषणाजी कोनगुलवार याचा शोध घेण्यात मात्र सीबीआयला अपयश आले असून त्याने जिल्हासत्र न्यायालयाने इरन्ना कोनगुलवार याचा अटकपुर्व जामीन मागणीचा अर्ज फेटाळल्या नंतर त्याने आता उच्च न्यायालयात अटकपुर्व जामीन मिळावा यासाठी धाव घेतली आहे. यावर सुनावणी प्रलंबित असून याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.
सदरील दोषारोप पत्र दाखल केल्यानंतर मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी सदरील प्रकरण बोर्डावर घेतले असून आता या प्रकरणातील न्यायालयीन कोठडीत असलेल्या मुख्य सुत्रधार एन. गंगाधर, संजय जाधव व जलील पठाण यांच्या मार्फत त्यांच्या वकीलांनी जामीनासाठी अर्ज केला होता. यावर मागच्या आठवड्यात सुणावणी घेऊन मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती चव्हाण यांनी निर्णय राखून ठेवला होता तो सोमवारी दिला असून त्यांनी एन.गंगाधरप्पा, संजय जाधव व जलील पठाण यांचे जामीन अर्ज फेटाळले आहेत. या सुणावणीत सीबीआयची बाजू जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. मंगेश महिंद्रकर यांनी मांडली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR