27 C
Latur
Saturday, December 21, 2024
Homeलातूरकिल्लारी परिसरात रात्री अज्ञात ड्रोनद्वारे टेहळणी

किल्लारी परिसरात रात्री अज्ञात ड्रोनद्वारे टेहळणी

किल्लारी : वार्ताहर
औसा तालुक्यातील किल्लारी, सिरसल आणि जोगणंिचंचोली गावांत ड्रोन उडताना दिसून आले आहेत. ड्रोनच्या माध्यमातून कोणी रेकी करीत आहे काकिंंवा कोणी बाँम्ब तर टाकणार नाही असा संशय नागरिकातून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सध्या भीतीच वातावरण निर्माण झाल आहे.  या ड्रोनबद्दल नागरिकांनी पोलिसांना संपर्क केला त्यावेळी सपोनि शहाणे यांच्या आदेशानुसार पीएसआय जळबाजी गायकवाड  व नागरीक वैभव बालकुंदे, अमर बालकुंदे यांनी पोलिसांसोबत या ड्रोनचा पाठलाग केला मात्र काही अंतरावर गेल्यानंतर ड्रोन नाहीसे झाले. त्यामुळे हे ड्रोन कुणी आणि कशासाठी या भागात पाठवले आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या घटनेमुळे दिवसभर नागरीकांत या विषयी चर्चेला उधाण आले आसून कांही दुर्घटना तर होणार नाही ना अशी चर्चा नागरिकात पसरली आहे.
घरावर थोडाजरी आवाज आला तर सर्वजण घराबाहेर येत आहेत. ड्रोनच्या लाईट व आवाज पहात आहेत कोणी तरी बाँम्ब वगीरे टाकले तर आपण संपलो अशी भिती व्यक्त करीत आहेत. पोलिस कर्मचा-यांनी नागरिकासोबत पाहणी केली परंतु हे ड्रोन नेमके कोण आपॅरेट करीत आहे याची माहिती घेतली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR