18.1 C
Latur
Sunday, December 22, 2024
Homeलातूरजि. प. कर्मचा-यांची पदोन्नती देण्याची मागणी

जि. प. कर्मचा-यांची पदोन्नती देण्याची मागणी

लातूर : प्रतिनिधी
जिल्हा परिषद कर्मचा-यांनी पदोन्नतीची मागणी केली असून, छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या प्रशासकांनी कर्मचा-यांना पदोन्नतीचा लाभ दिला. आम्हालाही छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेप्रमाणे लाभ द्यावा, अशी मागणी पदोन्नतीस पात्र असलेले कर्मचारी लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्याकडे करणार आहेत.
सध्या जिल्हा परिषदेत प्रतिनियुक्त्यांचा विषय जोरदार सुरू असून, जे कर्मचारी पदोन्नतीस पात्र आहेत. त्यांना अजून पदोन्नती मिळालेली नाही. हे कर्मचारी ब-याच दिवसांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असून, लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासकांनी या मागणीवर कार्यवाही करावी, अशी अपेक्षा कर्मचा-यांनी व्यक्त केली आहे. ब-याच दिवसांपासून हा विषय रेंगाळला असून, पात्र कर्मचारी प्रत्येक दिवशी पदोन्नती होईल, या आशेवर आहेत. मुख्य कार्यकारी अधिका-यांनी मनावर घेतल्यास कर्मचा-यांना पदोन्नती मिळणार आहे. सर्व पदोन्नतीस पात्र कर्मचारी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचा कागदोपत्री माहिती घेऊन लातूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांना भेटणार आहेत. या भेटीत कर्मचा-यांना पदोन्नतीचा लाभ मिळावा, अशी कर्मचा-यांना आशा आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR