लातूर : प्रतिनिधी
श्रावण महिन्यात पोळा, गणपती, महालक्ष्मी हे सण मोठ्या उत्साहात साजरा केले जातात. या सणांना नागवेलीच्या पानांना अधिक महत्व दिले जाते. श्रावण महिन्यात पूजापाट व धार्मिक विधींसाठी नागीनीच्या पानांची मागणी मोठ्या प्रमाणात असते. गत वर्षाच्या तूलनेत यंदा नागवेलीच्या पानांचे दर जवळपास २० टक्क्यांनी वाढले असल्याचे व्यसपा-यांने सागीतले. राज्यातील गावरान पानांचे दर २० टक्क्यांनी, तर कलकत्ता पानांचे दर दुप्पट वाढले आहेत.
भारतीय संस्कृतीत गावरान पानाला अनन्य साधारण महत्व आहे. कार्यक्रम होणताही असो. घरगुती कार्यक्रम असो की, विवाह समारंभ. पानाचा विडा नाही, असे होत नाही. धार्मिक कार्यक्रमात तर गावरान पानाचे महत्व अधिक आहे. सध्या बाजारात दाखल झालेल्या गावरान पान १० ते २० टक्के तर कलकत्ता पानाच्या किंमतीत दुपटीने वाढ झाली आहे. श्रावण महिन्यात पूजा, धार्मिक विधींसाठी गावरान पानांची मागणी वाढत असते. लातूर शहरातील बाजारपेठेत चेन्नई येथील मद्रासी पान येणे बंद झाल्याने गावरान व कलकत्ता पानांना अधिक पसंती दिली जाते. उमरगा सीमा भागातून हे पान शहरातील बाजारपेठेत विक्रिसाठी मागवले जातात, अशी माहीती ठोक विक्रेते हारुण ताबोंळी, अहमद शेख यांनी दिली आहे. गावरान पाने २० दिवसांपूर्वी ३० रुपये शेकडा होती. तर ती आता ५० रुपये शेकडा दराने मिळत आहेत.
कोलकाता येथून शहरातील बाजारपेठेत येणारी कलकत्ता पाने २०० रुपये शेकडा होती. तर त्यांचा दर ३५० रुपये झाला आहे. कलकत्ता आणि गावरान पानांचे भाव वाढले आहेत. अजुन १० ते १५ दिवसात काही प्रमाणात पानांचे दर वाढले जातील असेही ठोक विक्रेत्यांनी म्हटले आहे. पानाच्या दर वाढल्याने कलकत्ता पानापासून बनवले जाणारे मसाला पान आता २० रुपयांचे पान २५ रुपयांना मिळणार असल्याचे काही टपरीधारक यांनी सागीतले आहे.