26.1 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeलातूरहॉटेल-लॉजच्या नावाखाली सुरू आहेत कुंटणखाने

हॉटेल-लॉजच्या नावाखाली सुरू आहेत कुंटणखाने

लातूर : प्रतिनिधी
लातूरसह जिल्ह्यातील बहुतांश शहरात व तिल्ह्यातून गेलेल्या महामार्गावर हॉटेल, लॉजच्या नावाखाली सुरू असलेल्या कुंटणखान्यांमुळे शहर व महामार्ग बदनाम होत असून पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.ह्यासेच या व्यवसायातून मोठा ‘मलिदा’ मिळत असल्यानेच कारवाई करण्यात होत नसल्याचा आरोप नागरीकांतून व्यक्त केला जात आहे. लातूरशहरासह जिल्ह्यातील भागात वाहनचालक व इतर प्रवाशांसाठी बहुतांश लॉजिंग-बोर्डिंग सज्ज आहेत. कालांतराने कुंटणखाना चालवण्याकडेच अनेक लॉजिंग-बोर्डिंगनी मोर्चा वळविला आहे.
या व्यवसायातून अफाट पैसा मिळत असल्याने अनेकांनी मोठी आर्थिक गुंतवणूक करून आलिशान लॉंिजग उभारले आहेत. या लॉजिंगमध्ये नेमके कोणते उद्योग चालतात, याची पुसटशीही  कल्पनाही येत नाही. परंतु आंबटशौकिनांना या उद्योगाची पुरेपूर माहिती आहे.  बाहेरून ‘कॉलगर्ल’ मागवून त्यांना प्रवासी म्हणून दाखवणे आणि या व्यवसायातून उखळ पांढरे करून घेणे, असाच उद्योग शहरी भागतील व महामार्गावरील काही हॉटेल व्यावसायिकांनी चालविला आहे.अशा लॉजेसवर ‘पाखरू’ पाठवण्यासाठी शहरातील काही ‘हस्तक’ गि-हाईकांची खात्री पटल्यानंतर मोबाईलवरच युवतींचे दिमाखदार फोटो पाठवून निवड करण्याची सूचना करतात.
गि-हाईकाच्या निवडीनंतर संबंधित युवतीला संबंधित लॉजवर पाठविले जाते. हायप्रोफाइल ते घरगुती महिला मिळवून देणारा ‘माणूस’ म्हणून ‘त्याची’ चांगलीच ओळख आहे. सकाळी १० ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत अंदाजे १६ ते २८ वयोगटातील युवती तोंडावर रुमाल बांधून सरार्सपणे थेट लॉजकडे जातात. त्यांना कोणी दुचाकीने आणून सोडतात. काही ऑटोरिक्षामधून येतात. यात काही अल्पवयीन मुलीसुध्दा असतात. त्यामुळे आंबटशौकिनांची मोठी गर्दी असते. धंदा बिनधोक चालला आहे. यासाठी अधिका-यांना दरमहा घसघशीत ‘दाम’ मिळत असल्याची उघड चर्चा आहे.
शासनाने लॉजिंग चालविण्यासाठी कडक नियम घालून दिले असून लॉजचा वापर करणा-या प्रवाशांकडून ओळखपत्र घेणे सक्तीचे आहे. लॉजचा वापर कोणत्या कारणासाठी होणार आहे, याचाही उल्लेख रजिस्टरमध्ये आवश्यक असतो. मात्र, असे कोणतेही नियम लॉजेसकडून पाळले जात नाहीत. त्यामुळे या लॉजेसमध्ये बलात्कार झाल्याची तक्रार यापूर्वी  अनेकदा झाली. परंतु त्यापासून कोणताही बोध घेतला जात  नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR