नवी दिल्ली : प्रतिनिधी
गतविजेत्या भारतीय संघाची एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४ स्पर्धेत जबरदस्त कामगिरी सुरु आहे. एकापाठोपाठ एक सामने जिंकत विजयी चौकार मारला आहे. रॉबिन राउंड फेरीत टीम इंडियाने दक्षिण अफ्रिकेला पराभवाची धूळ चारली आहे. दक्षिण अफ्रिकेला ३-१ पराभूत करत उपांत्य फेरीतील स्थान पक्कं केलं आहे.
दक्षिण अफ्रिकेविरुद्ध कर्णधार हरमनप्रीत सिंहने २गोल, तर अरिजीत सिंह हुंडलने एक गोल केला. हरमनप्रीतचे दोन्ही गोल पेनल्टी कॉर्नरवरून आले. तर अरिजीतने फिल्ड गोल मारला. भारताकडून पहिल्या सत्राच्या आठव्या मिनिटाला अरिजीत सिंह हुंडलन गोल मारत खाते खोलले. त्यानंतर पुढच्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि कर्णधार हरमनप्रीत सिंहने त्या संधीचं सोनं केलं. पहिल्या सत्रात भारताकडे २-० ने आघाडी होती.
त्यामुळे बरोबरी साधण्यासाठी दक्षिण अफ्रिकेची धडपड सुरु होती. दुस-या सत्राच्या शेवटच्या मिनिटाला कोरियाच्या यांगने गोल मारला. तर तिस-या सत्रात हरमनप्रीतने एक आणखी गोल मारला आणि सामना ३-२ असा आणला. शेवटपर्यंत अशीच स्थिती राहिली आणि भारताने हा सामना जिंकला.