कोलकताः मी मागील दोन तासांपासून आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांची वाट पाहात होते. मी राज्यातील नागरिकांच्या भल्यासाठी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायलाही तयार आहे. असा दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेमध्ये केला.
तिसऱ्यांदा प्रयत्न करूनही संपकरी डॉक्टर आणि सरकारमध्ये चर्चा होऊन न शकल्याने मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. थेट प्रक्षेपणाच्या मुद्द्यावर संपकरी डॉक्टर ठाम राहिल्याने निवासी डॉक्टरांमध्ये आणि पश्चिम बंगाल सरकारमधील सरकारमध्ये आजही चर्चा होऊ शकली नाही. अखेर निवासी डॉक्टरांच्या प्रतिनिधींची दोन तास वाट पाहून ममता बॅनर्जी नाबन्ना येथून निघून गेल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले.