मुखेड:प्रतिनिधी
मुखेड तालुक्यातील मौजे रावणगाव/गोणेगाव येथे होत असलेल्या लेंडी प्रक्लपाचे काम अनेक वषार्पासून संथगतीने सुरु आहे सदर धरणात शेती आणी घरे जात असलेल्या तब्बल बारा गावातील प्रक्लपग्रस्तांच्या मागण्यां कुठल्या ना कुठल्या कारणाने आजतागायत प्रलंबित राहिल्या आहेत त्यांचे रखडलेले प्रलंबित प्रश्न सोडविण्यापुर्वीच सरकारने सद्यस्थितीत तो प्रक्लप पूर्ण करण्याच्या हालचाली वेगाने सुरु केल्या आहेत त्यामुळे येथिल बारा गावातील प्रक्लपग्रस्त नागरिकांनी प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्काच्या विविध मागण्यांसाठी गोणेगाव येथील धरणावरच दि.२० नोव्हेंबर पासुन साखळी उपोषण सुरु केले आहे या साखळी उपोषणाचा आज ०९ दिवस आहे.आधी पुनर्वसन करा मगच धरण पूर्ण करा असा एकजुटीने ठाम निर्णय सर्व प्रक्लपग्रस्तांनी घेतला आहे.या उपोषणास मुखेड तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिका-यांनी भेट दिली असुन युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष बोनलेवाड यांनी पाठिंबा दर्शविला आहे.
लेंडी संघर्ष समितीच्या नेतृत्वात सुरु असलेल्या साखळी उपोषणास तालुक्यातील अनेकांनी भेटी देवून उपोषणास पाठिंबा दर्शवत आहेत.जोपर्यंत आमच्या सर्व मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार असल्याची माहिती लेंडी संघर्ष समितीचे अध्यक्ष राजु पाटील रावणगावकर यांनी दिली आहे.२००६ च्या शासकीय निर्णयाप्रमाणेच सर्व बारा गावांचे भौतिक सुविधेसह पुनर्वसनाचे काम काम पूर्ण करा तरच धरणाच्या बांधकामाला हात लावा,सर्व सुशिक्षित बेरोजगार प्रकल्पग्रस्तांना प्रत्येक १० लाख रुपए द्यावे, संपादित २ हजार ३३१ हेक्टर जमिनीस २०१३ चा कायदा लागू करावे, भुखंड नसतील त्याठिकाणी सरसकट स्वेच्छा पुनर्वसन लागू करावे, तसेच १८ वर्षावरील मुला-मुलींना वाढीव कुंटुबांत समाविष्ट करावे, हेक्टरी २५ लक्ष रुपयाचे पॅकेज शासनाने घोषीत करावे किंवा शेतक-्यांच्या संपादीत केलेल्या जमीनी परत मिळाव्यात अशा विविध मागण्यांसाठी बुढीत क्षेत्रातील प्रकल्पग्रस्त नागरीक शासन व प्रशासनाच्या विरोधात साखळी उपोषणाच्या मागार्ने आंदोलन करीत आहेत सदर उपोषणास मुखेड काँग्रेसच्या पदाधिका-्यांनी भेट देऊन पाठींबा दर्शविला आहे.
यावेळी लेंडी प्रकल्प संघर्ष समितीचे राजीव पाटील रावणगावकर, उमाकांत वाकोडे भिंगोलीकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष हणमंतराव नारनाळीकर,महाराष्ट्र सेवादल कॉंग्रेसचे प्रदेश सचिव अण्णासाहेब जाहीरे, जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस आकाश पाटील उन्द्रीकर, चंद्रशेखर पाटील यांच्यासह आंदोलनकर्ते नागरीक अजित देशमुख, वैजनाथ अण्पा तिपणे, नागेश पाटील, हणमंत चव्हाण, व्यंकटराव देशमुख, दिपक देशमुख,निळकंठ पाटील, नारायण पाटील, सुर्यकांत कोळनुरकर सह अनेकांची उपस्थिती होती.