24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीयआता चांद्रयान-४ मोहीम

आता चांद्रयान-४ मोहीम

मोहिमेचा विस्तार, केंद्र सरकारने दिली मंजुरी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत चांद्रयान मोहिमेबाबत महत्वाचा निर्णय घेतला. केंद्रीय मंत्रिमंडळाने आता ‘चांद्रयान-४’ या मोहिमेला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती दिली. चांद्रयान-४’ मोहिमेचा विस्तार करण्याच्या पार्श्वभूमावर सरकारने ही मंजुरी दिली आहे.
चांद्रयान-४ मोहिमेचा विस्तार करण्यासाठी आज महत्वाचा निर्णय घेण्यात आला. या मोहिमेला आता आणखी काही घटक जोडण्यात येणार आहेत. चंद्रावर मानवयुक्त मोहिमेची पुढील पायरी असणार आहे. या दिशेने सर्व तयारीच्या पार्श्वभूमीवर ‘चांद्रयान-४’ या मोहिमेला मान्यता देण्यात आली. व्हीनस ऑर्बिटर मिशन, गगनयान फॉलो-ऑन आणि भारतीय अंतरिक्ष स्टेशन आणि नेक्स्ट जनरेशन लॉन्च व्हेईकल डेव्हलपमेंटलाही मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

या मोहिमेमध्ये प्रत्येकी पाच मॉड्युल असलेले दोन अंतराळयान स्टॅक असणार आहेत. तसेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) चांद्रयान-४ मिशन येत्या ३६ महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा करण्यात आली आहे. स्टॅक १ चंद्राच्या नमुना संकलनावर लक्ष केंद्रित करेल, तर स्टॅक २ पृथ्वीवर नमुने हस्तांतरण आणि पुनर्प्रवेश हाताळेल. ‘चांद्रयान-४’ या मोहिमेसाठी तब्बल एकूण २,१०४.०६ कोटी रुपयांची आवश्यकता असणार असून या निधीला मान्यता देण्यात आल्याचे अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले.

३६ महिन्यांच्या मोहिमेत चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणे, तसेच तेथील नमुने गोळा करणे आणि पृथ्वीवर परत आणणे हे उद्दिष्ट असणार आहे. चांद्रयान ४ मध्ये चंद्राच्या कक्षेत जटिल डॉकिंग आणि अनडॉकिंग ऑपरेशन्सचा समावेश असेल. ज्यामुळे भारताच्या अंतराळ क्षमतांत लक्षणीय प्रगती होईल. तसेच एप्रिल २०१४ मध्ये इस्रोने चांद्रयान-४ ची योजना आधीच आखली होती. ज्यामध्ये दोन रॉकेट-एलव्हीएम-३ आणि पीएसएलव्ही पाठवण्याचा समावेश आहे.

मोहिमेसाठी २,१०४ कोटी मंजूर
चांद्रयान-३ च्या यशानंतर केंद्र सरकारने चांद्रयान-४ साठी २,१०४ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ३६ महिन्यांच्या मिशन टाइमलाइनमध्ये

३६ महिन्यांत मोहीम फक्ते
आता ही मोहीम पुढील ३६ महिन्यांत उद्योग आणि शैक्षणिक संस्थांच्या सहभागाने पूर्ण केली जाईल. तसेच यासंबंधीचे सर्व महत्त्वाचे तंत्रज्ञान स्वदेशी पद्धतीने विकसित करण्याची संकल्पना आहे. या चांद्रयान-४ च्या मोहिमेत अतिरिक्त घटकांसह विस्तार करण्यात आला असून आता पुढची पायरी म्हणजे चंद्रावर जाणारी मानव मोहीम असणार आहे, असे सांगण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR