18.8 C
Latur
Friday, January 3, 2025
Homeमहाराष्ट्रखाद्यतेल महागले!

खाद्यतेल महागले!

खाद्यतेलाच्या दरामध्ये २० रुपयांची वाढ

मुंबई : ऐन दसरा, दिवाळीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या किमतींमध्ये १० ते २० रुपयांची वाढ झाली आहे. वाढत्या दरामुळे गृहिणींचे बजेट बिघडलेले दिसत आहे. आता स्वयंपाकघरातील फोडणी महाग झाली आहे. महिन्याभरापूर्वी १२० रुपये किलो दराने मिळणारे सोयाबीन तेल आता १४० ते १५० रुपये किलो दराने मिळत आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने तेलावरील एक्साईज ड्युटी वाढवल्यामुळे ही दरवाढ झाली आहे. भारत वनस्पती तेलाची बरीचशी मागणी आयातीद्वारे पूर्ण करतो. पामतेल, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाची आयात केली जाते. मात्र, त्या त्या देशातील परिस्थितीनुसार पुरवठा कमी झाला किंवा दरवाढ झाली तर त्याचा थेट परिणाम दरांवर होतो.

महिन्याला काटकसर करून किराणा घेतला जातो. महिन्याला साधारणत: चार ते पाच लिटर तेल लागते. आता तेल विकत घेताना वाढलेले दर पाहून धक्काच बसला. दरवाढीमुळे महिन्याच्या बजेटमध्ये आणखी वाढ झाली आहे, असे गृहिणी कल्पना मिरेकर यांचे म्हणणे आहे. एक्साईज ड्युटी वाढल्यामुळे तेलाचे भाव वाढले आहेत. ग्राहकांनी किराणा व्यावसायिकांबाबत गैरसमज करू नयेत. घाऊक बाजारामध्ये प्रति दहा किलोमागे २० ते ३० रुपयांची वाढ झाली आहे. मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये २ ते ४ लिटरप्रमाणे तेलाची खरेदी केली जाते. त्यामुळे त्या ग्राहकांना प्रतिलिटर १० ते २० रुपये दरवाढ सहन करावी लागत आहे. – योगेश आलटकर, घाऊक व्यापारी.

गृहिणींसाठी डोकेदुखी-
तेलाच्या दरात टप्प्याटप्प्याने होणारी दरवाढ गृहिणींसाठी डोकेदुखी ठरली आहे. राज्य सरकारने सर्वसामान्यांच्या विचार करून दरवाढीसंदर्भात निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा गृहिणींमधून व्यक्त होत आहे.
महागाईमुळे सर्वसामान्य कुटुंबीयांना दर महिन्याला खर्चाचे नियोजन करणे अवघड होत चालले आहे. दैनंदिन वापरात येणा-या वस्तूंमागे एक्साईज ड्युटी वाढवून भाववाढ झाली तर आम्ही जगायचे कसे? असा प्रश्न महिलावर्ग विचारत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR